"सोने घ्या, जे हवे ते घ्या, पण मारू नका..." Expressway वर महिलेने पसरला पदर, तरीही नराधमांनी पतीला...VIDEO

Highway robbery extortion case: देशातील अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेसवेवर अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी  घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Highway robbery : कारच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे.
मुंबई:

Highway robbery extortion case: देशातील अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेसवेवर अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी  घटना समोर आली आहे. भररस्त्यात वाहनांच्या प्रचंड गर्दीत एका कुटुंबाला अडवून काही गुंडांनी पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी एक महिला 'माझे सर्व दागिने घ्या, जे हवे ते घ्या, पण माझ्या पतीला सोडा' अशी गयावया करत अक्षरशः पदर पसरून भीक मागत होती. मात्र, त्या क्रूर गुंडांना तिची जराही दया आली नाही आणि त्यांनी तिच्या डोळ्यांसमोर तिच्या पतीला मारहाण करणे सुरूच ठेवले. एका मागच्या कारच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली असून, हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

या बाबात मिळालेल्या  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील मड्डूरजवळ बेंगळुरू-मैसूरू एक्सप्रेसवेवर घडली. बेंगळुरूचे रहिवासी असलेले सागर कुमार हे आपल्या पत्नी, 10 महिन्यांचे लहान मूल आणि कुटुंबातील एका वृद्ध महिलेसह कारने प्रवास करत होते. 

Advertisement

एक्सप्रेसवेवर प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे सागर यांची कार समोरच्या एका वाहनाला अगदी किरकोळ घासली. या मामुली अपघातानंतर समोरच्या वाहनातील लोकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून सागर यांची कार भररस्त्यात अडवली.

( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )

10 महिन्यांच्या बाळासमोर कुटुंबावर हल्ला

पीडित सागर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायवेवर जवळपास 9 जणांच्या टोळीने त्यांच्या कुटुंबाला वेढले आणि त्यांना कारबाहेर ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. सागर म्हणाले की, त्या नराधमांनी माझी पत्नी, वृद्ध आई आणि आमच्या 10 महिन्यांच्या लहान बाळालाही सोडले नाही. 

कारमधील महिला आणि मूल प्रचंड घाबरले होते. सागर यांच्या पत्नीने हात जोडून गुंडांकडे विनवणी केली, पण त्यांनी मारहाण थांबवली नाही. अखेर पतीला वाचवण्यासाठी तिने स्वतःचे सोन्याचे दागिने देण्याची तयारी दर्शवली, तरीही त्या गुंडांनी सागर यांना बेदम मारहाण करणे सुरूच ठेवले.

डॅशकॅम व्हिडिओमुळे सत्य उघड

या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ मागून येणाऱ्या एका कारच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गुंड सागर यांना रस्त्याच्या मध्यभागी ओढत आहेत आणि मारहाण करत आहेत, तर त्यांची पत्नी त्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. सागर यांनी सांगितले की, आमच्या गाडीचा डॅश कॅम व्हिडिओ समोर आला म्हणून आम्ही नशीबवान ठरलो, अन्यथा हायवेवर अशा अनेक घटना घडतात ज्यांचे पुरावेच नसतात. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागर यांनी सोमवार रोजी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली.

Advertisement

( नक्की वाचा : Siya Goyal: सोनमच्या चुकांमधून सियाने घेतला धडा अन केतन अग्रवालच्या हत्येचा रचला परफेक्ट प्लॅन, वाचा अपडेट )

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून 3 मुख्य आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या भयंकर अनुभवानंतर सागर यांनी हायवेवरील सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्सप्रेसवेच्या अनेक भागांत अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, ज्याचा फायदा घेऊन हे गुंड पळून जातात, असे सांगत त्यांनी हायवेवर पोलिसांची गस्त आणि सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे. या घटनेने देशातील महामार्गांवर प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

पाहा संपूर्ण VIDEO