केंद्र सरकारच्या कथित कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरुद्ध देशभरातील 25 कोटींहून अधिक कामगार आज 9 जुलै रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), हिंद मजदूर सभा (HMS), CITU, INTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC आणि इतरांसह 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. या संपाला संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांचाही पाठिंबा आहे.
कामगारांचा हा संप प्रामुख्याने चार नवीन कामगार संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आला आहे, जो कामगारांच्या हक्कांना चिरडून टाकेल असे संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, किमान वेतन 26 हजार रुपये, कंत्राटी नोकऱ्या संपवणे, सरकारी विभागांच्या खाजगीकरणावर बंदी घालणे आणि बेरोजगारी भत्ता या मागण्यांचा समावेश आहे. सरकारने भांडवलदारांना 17 लाख कोटी रुपयांचा दिलासा दिला, तर कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांचा आहे.
नक्की वाचा - CA Result 2025 : छत्रपती संभाजीनगरचा डंका, CA अंतिम परीक्षेत राजन देशातून पहिला; जिल्ह्यातील 7 विद्यार्थी रँकमध्ये
काय सुरू आणि काय बंद राहणार?
काय बंद?
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
सरकारी बस
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
सरकारी कारखाने
कंपन्यांचे उत्पादन
काय सुरू?
खासगी कंपनी
रुग्णालये
वैद्यकीय
आपत्कालिन सेवा
खासगी शाळा
महाविद्यालये
ऑनलाइन सेवा