बिहारी माफियांचं कंबरडं मोडणाऱ्या मराठी IPS अधिकाऱ्यानं दिला अचानक राजीनामा

Shivdeep Lande : बिहारमधील मराठी सुपर कॉप IPS शिवदीप वामराव लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

बिहारमधील मराठी सुपर कॉप शिवदीप वामराव लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते पूर्णिया रेंजचे आयजी होते. बिहारमधील माफियांचे कर्दनकाळ म्हणून लांडे यांची ओळख होती. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असलेले लांडे हे बिहारसह संपूर्ण देशात नेहमी चर्चेत होते. त्यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत राजीनामा दिल्याची माहिती सर्वांना दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या प्रिय बिहार, मी गेली 18 वर्ष सरकारी पदावर माझी सेवा दिल्यानंतर आज माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. या काळात मी नेहमीच बिहारला माझ्या कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य दिलं. सरकारी सेवक म्हणून माझ्या कामात काही कमतरता राहिली असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी आज भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. पण, मी बिहारमध्येच राहणार आहे. बिहारच माझी पुढंही कर्मभूमी असेल. जय हिंद


राजीनाम्यानंतर खळबळ

शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सोशल मीडिया तसंच सामान्य नागरिक अनेक प्रश्न विचारत आहे. इतक्या प्रामाणिक अधिकाऱ्याला राजीनामा का द्यावा लागला? असा प्रश्न लोकं विचारत आहेत. त्यांच्यावर कुणाचा दबाब होता का?  त्यांनी मनासारखं काम करु दिलं जात नव्हतं का? असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. 

( नक्की वाचा : NPS Vatsalya : आता मुलांच्या पेन्शनचीही झाली सोय, काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? )
 

Topics mentioned in this article