रामराजे शिंदे, दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहिला आहे. यावरुनच संसद भवन परिसरात विरोधक आंदोलन करत आहेत तर प्रत्यूत्तरात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनादरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप सारंगी धक्काबुक्की मध्ये जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. या निदर्शनावेळी भाजप खासदाप प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळेच जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला आणि त्यानंतर त्याचा धक्का लागल्यामुळे मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि माझ्याजवळ असलेल्या खासदाराला धक्का दिला. त्यामुळे पडल्याचे ते म्हणालेत. दुसरीकडे फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यांना दक्षता विभागात दाखल करण्यात आले असून पीयूष गोयल , धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चौहान , प्रल्हाद जोशी इस्पितळात पोहचले आहेत
या आरोपानंतर राहुल गांधींनीही स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा मी संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमक्या देत होते, त्यामुळे हे घडले. हा संसदेचा विषय आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते संविधानावर हल्ला करत आहेत, असं ते म्हणालेत.
दरम्यान,भारतीय जनता पक्ष त्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांनी अमित शहांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, असे म्हणत काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर