Satyapal malik Passed Away: जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दुःखद निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचादारम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना किडनीचा त्रास होता, ज्यावर ते उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.
जम्मू आणि काश्मीर, गोवा, बिहार आणि मेघालयचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांचे मंगळवार 5 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते अनेक दिवस रुग्णालयात होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सत्यपाल मलिक यांच्या सोशल मीडिया अकाउंट x वर त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
सत्यपाल मलिक हे शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार आणि अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतांमुळे चर्चेत आले. जेव्हा कलम 370 आणि कलम 35अ रद्द करण्यात आले तेव्हा सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल झाले होते. तसेच जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले तेव्हा सत्यपाल मलिक केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल झाले.