Love Story : पहिल्या मेहुणीशी लग्न, दुसरीसाठीही तोच हट्ट , 33 हजार व्होल्टच्या टॉवरवर तरुणाचा जीवघेणा स्टंट

Love Story : मेहुणीसोबत लग्न करण्याच्या हट्टापायी एका तरुणाने चक्क 33 हजार व्होल्टच्या विजेच्या टॉवरवर चढून 'शोले' चित्रपटातील दृश्याची आठवण करून दिली

जाहिरात
Read Time: 2 mins
Love Story : मेहुणीशी लग्न लावावं म्हणून हा तरुण टॉवरवर चढला होता.
मुंबई:

Love Story : मेहुणीसोबत लग्न करण्याच्या हट्टापायी एका तरुणाने चक्क 33 हजार व्होल्टच्या विजेच्या टॉवरवर चढून 'शोले' चित्रपटातील दृश्याची आठवण करून दिली. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. कुटुंबाने तिसऱ्या मेहुणीसोबत लग्न करण्यास नकार दिल्यावर, राज सक्सेना नावाच्या या तरुणाने तब्बल 7 तास टॉवरवरून खाली उतरण्यास नकार दिला. अखेर, कुटुंबाने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतरच तो खाली उतरला.

काय आहे प्रकरण?

कन्नौजच्या छिबरामऊ तालुक्यातील कल्याणपूर गावात ही घटना घडली. राज सक्सेना या तरुणाचे मन त्याच्या दुसऱ्या मेहुणीवर जडले होते आणि त्याने तिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. आता पुन्हा एकदा तो आपल्या तिसऱ्या मेहुणीच्या प्रेमात पडला. राजने जेव्हा पत्नीला याबद्दल सांगितले, तेव्हा तिने बहिणीसोबत लग्न करण्यास ठाम नकार दिला. यामुळे संतापलेल्या राजने घराजवळील 33 केव्हीच्या विजेच्या टॉवरवर चढून गोंधळ सुरू केला.

( नक्की वाचा : पुन्हा एकदा ‘चांद नवाब'! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय' Video Viral )
 

हा 'हाय-व्होल्टेज ड्रामा' सुमारे 7 तास सुरू होता. राज सुमारे 7 तास टॉवरवर चढून धर्मेंद्रसारखे 'शोले'चे डायलॉग बोलत होता. या दरम्यान, तिथे गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी त्याला खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकना. अखेर, कुटुंबातील सदस्यांनी लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तो सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास टॉवरवरून खाली उतरला.

या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. खाली उतरल्यानंतर राजने आनंद व्यक्त करत म्हटले की, आता तो त्याची  पत्नी आणि मेहुणी अशा दोघींसोबत आनंदाने आयुष्य घालवेल.

Advertisement
Topics mentioned in this article