'मी त्यांना ओळखलेच नाही' पाकिस्तानच्या ताब्यातील BSF जवान परतल्यानंतर पत्नीनं पहिल्यांदा काय सांगितलं?

भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान बॅकफुटवर आला आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेले सीमा सुरक्षा दलाचे  (BSF) जवान पूर्णम साहू यांना परत पाठवलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान बॅकफुटवर आला आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेले सीमा सुरक्षा दलाचे  (BSF) जवान पूर्णम साहू यांना परत पाठवलं आहे. 20 दिवसांहून अधिक काळ पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर पूर्णम साहू अटारी सीमेवरून भारतात परत आले आहेत. साहू भारतामध्ये परतल्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. 'मी आज किती आनंदी आहे, हे सांगायला माझ्याकडं शब्द नाहीत,' अशी भावना त्यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

साहू यांच्या पत्नी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, '  आज आमचं पूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे.  मी माझ्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलले, तेव्हा पहिल्या नजरेत मी त्यांना ओळखलेच नाही. ते ठीक आहेत. त्यांनी मला सांगितले की तू घाबरू नकोस, मी परत आलो आहे. ते परत आल्यानंतर आता आमची सगळी काळजी दूर झाली आहे.'

ममता बॅनर्जी यांचे मानले आभार 

साहू यांच्या पत्नीने सांगितले की, 'माझ्या पतीच्या परत येण्यात आमच्या संचालकांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मला पूर्ण साथ दिली. त्यांनी गेल्या तीन दिवसांत दररोज माझ्याशी बोलल्या. आणि अखेर आज माझे पती मायदेशी परत आले.

पाकिस्तानने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर त्यांना ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या सर्व घडामोडींमध्ये पूर्णम साहू यांचे कुटुंबीय त्यांच्या परत येण्याची वाट पाहात होते.  

Advertisement

( नक्की वाचा : Operation Sindoor भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुगळती झाली? परराष्ट्र मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण )
 

BSF ने काय सांगितलं?

बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज बीएसएफ जवान पूर्णम कुमार साह, जे 23 एप्रिल 2025 पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते, त्यांना संयुक्त तपासणी चौकी अटारी, अमृतसर मार्गे सुमारे 10.30 वाजता भारताकडे सोपविण्यात आले. हस्तांतरण शांततापूर्ण आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार झाले."

40 वर्षीय पूर्णम साहू 23 एप्रिल रोजी नकळत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले होते आणि त्यानंतर त्यांना 'पाकिस्तान रेंजर्स'नी ताब्यात घेतले होते. पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या 182 व्या बटालियनमध्ये तैनात असलेले पूर्णम साहू गणवेशात होते आणि त्यांच्याजवळ त्यांची सर्व्हिस रायफलही होती. बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना त्यावेळी घडली जेव्हा साहू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या एका गटाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यासोबत होते. ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी गेले आणि नकळत पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. त्यांना त्वरित पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले.
 

Advertisement
Topics mentioned in this article