BSNL Recharge Plans 2025: बीएसएनएलचा धमाकेदार प्लॅन; मिळतोय 600 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL Recharge Plans 2025: वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन जबरदस्त ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BSNL ₹1999 Plan: या प्लॅनमध्ये ग्राहकांना 600GB डेटा मिळणार आहे.
मुंबई:

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एक अतिशय आकर्षक आणि दीर्घ मुदतीचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवा ₹1999 चा असून, या प्लॅनमुळे सतत रिचार्ज करण्याच्या टेन्शनपासून मुक्ती मिळणार आहे.  वर्षभर सिम कार्ड अॅक्टीव्ह ठेवण्यासोबतच, दिवसाला दीड जीबीपेक्षा डेटा, अमर्याद कॉलिंग सुविधा अशा सगळ्या सुविधा या एका प्लॅनमुळे मिळणार आहेत.  इतर खासगी कंपन्यांच्या वर्षभरासाठीच्या प्लॅनच्या तुलनेत हा प्लॅन अत्यंत किफायतशीर असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

( नक्की वाचा: चॉकलेटपेक्षा स्वस्त! दिवसाला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग फक्त 1 रुपयांत )

काय आहेत BSNL ₹1999 प्लॅनची वैशिष्ट्ये?

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळते, ज्यामुळे त्यांना 12 महिने रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. यासोबतच, याशिवाय या प्लॅनमध्ये अन्य जबरदस्त फायदे आहेत. ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर (लोकल आणि STD) अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली असून यामुळे कॉलिंग पूर्णपणे निशुल्क असणार आहे.  

BSNL ₹1999 च्या प्लॅनमध्ये डेटा किती मिळणार ?

डेटाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 600 GB डेटा मिळतो. या डेटासाठी रोजच्या वापराची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाहीये, म्हणजेच वर्षभरात हा डेटा कधीही वापरता येईल. 600 GB डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 kbps पर्यंत कमी करण्यात येईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS मिळणार आहेत. हल्ली एसएमएसचा वापर व्हॉटसअप सारख्या इन्स्टंट मेसेजिंगसारख्या सेवांमुळे कमी झाला असला तरी जे ग्राहक एसएमएस आजही मोठ्या प्रमाणावर वापरतात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. 

( नक्की वाचा: रोहित शर्माच्या नव्या कारची किंमत झाली उघड! 3015 नंबर निवडण्याचं आहे खास कारण )

सबस्क्रिप्शनही फ्री मिळणार

या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विविध सबस्क्रिप्शनही देण्यात येणार आहेत.  ग्राहकांना 365 दिवसांसाठी WOW Entertainment, Zing Music, BSNL Tunes आणि Hardy Games सारख्या सेवा निशुल्क मिळणार आहेत. त्यामुळे या प्लॅनमुळे केवळ डेटा आणि कॉलिंगची सेवा मिळणार असे नसून मनोरंजनासाठीच्या सबस्क्रिप्शन सेवाही मिळणार आहेत.  

Advertisement

वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन जबरदस्त ठरणार आहे. BSNL चा हा प्लॅन बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत किफायतशीर असून, तो ग्राहकांना व्हॅल्यू-फॉर-मनी ऑफर देतो असा दावा करण्यात आला आहे.  BSNL ग्राहकांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी विविध उपाययोजना करत असून नव्याने लाँच करण्यात येणारे प्लॅन, सुधारलेली नेटवर्क सुविधा हा त्याचाच एक भाग आहे.