Bullet train: 320 किमी प्रतितास वेग, 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, भारतात येणाऱ्या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्य काय?

E5 सिरीजच्या तुलनेत यात अनेक सुविधा आहेत. भारतासाठी या बुलेट ट्रेनमध्ये थोडे खास बदल केले जातील.

जाहिरात
Read Time: 3 mins

जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त 2 तासांत मुंबईहून अहमदाबादला जाऊ शकता, तर आमच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जपानमधून 'वेगाचा बादशाह' भारतात येणार आहे. एक अशी बुलेट ट्रेन जी एका तासात 320 किलोमीटर धावते. या दोन शहरांदरम्यान जपानची शिंकानसेन बुलेट ट्रेन चालवण्याची योजना जुनी आहे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. ही बुलेट ट्रेन त्यांच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे. इतकंच नाही, तर पीएम मोदी या प्रगत ट्रेन चालवण्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय चालकांना भेटण्याची शकता ही या दौऱ्यात आहे.

त्याआधी भारतीय रेल्वे आणि जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीने चार वर्षे यावर अभ्यास केला होता. ही बुलेट ट्रेन भारतात आणली पाहिजे का? दोन वर्षांनंतर एका सामंजस्य करारावर (memorandum of understanding) स्वाक्षरी करण्यात आली. ज्यात जपानने सॉफ्ट लोनद्वारे (soft loan) प्रकल्पासाठी 80 टक्के निधी देण्यास सहमती दर्शवली. मात्र, पुढील काही वर्षांत विलंब झाला. पण त्यानंतर कामाला वेग आला आहे. पहिला टप्पा गुजरातमध्ये 2027 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण मार्ग 2028 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांमधील अंतर 508 किमी आहे. ही ट्रेन दोन तास सात मिनिटांत हे अंतर कापेल. असं मानलं जात आहे की पीएम मोदी आणि जपानचे सध्याचे पंतप्रधान शिगेरु इशिबा भारतात इतर बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी ही करार करू शकतात. 2009 मध्ये पुणे ते अहमदाबाद आणि दिल्ली ते अमृतसर, चंदीगडमार्गे असे पाच इतर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची देखील निवड करण्यात आली होती.

बुलेट ट्रेन म्हणजे काय?

बुलेट ट्रेन म्हणजे वेगाची वेगळी पातळी असते. हे इतर देशांमध्ये धावणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कसारखेच आहे. सुरुवातीला भारताने फ्रान्ससोबत हा प्रकल्प बांधण्याचा विचार केला होता. सध्या चीन, दक्षिण कोरिया, तुर्की, स्पेन, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि बेल्जियम सारख्या देशांमध्ये या सेवा आहेत. एखादी ट्रेन तेव्हाच 'बुलेट ट्रेन' म्हणवली जाईल जेव्हा ती कमीतकमी 250+ किमी प्रतितास वेगाने धावते. तिच्यासाठी वेगळ्या रुळांची व्यवस्था असते.

शिंकानसेन सिरीजची बुलेट ट्रेन
भारताची सुरुवातीला E5 शिंकानसेन सिरीजची ट्रेन खरेदी करण्याची योजना होती. मात्र, जेव्हा प्रकल्पात विलंब झाला आणि यादरम्यान जपानमध्ये तंत्रज्ञानात प्रगती झाली, तेव्हा त्यांनी भारताला पुढच्या पिढीची E 10 सिरीजची बुलेट ट्रेन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. याचं डिझाइन प्रसिद्ध सकुरा (sakura) किंवा चेरी ब्लॉसम फुलांपासून प्रेरित आहे.  यात कमीतकमी एक अपग्रेड समाविष्ट आहे. ही ट्रेन भूकंप-रोधक (earthquake-resistant) आहे. म्हणजे भूकंप जरी आला तरी तिला काहीही होणार नाही. 

Advertisement

E5 सिरीजच्या तुलनेत यात अनेक सुविधा आहेत. भारतासाठी या बुलेट ट्रेनमध्ये थोडे खास बदल केले जातील. त्यात जास्त सामान ठेवण्याची जागा असेल, व्हीलचेअरसाठी खास खिडकीच्या जागा असू शकतात. ईस्ट जपान रेल्वे कंपनीद्वारे डिझाइन केलेल्या E 10 चा कमाल वेग 320 किमी प्रतितास आहे. जो E5 सिरीजच्या बरोबरीचा आहे. मात्र, E10 चा सर्वोच्च वेग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित आहे. जर गरज पडली, तर ही पुढच्या पिढीची ट्रेन 360 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.