Luxury Life: कमी खर्चात परदेशात राजेशाही थाट! निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी 'हे' देश ठरतायत पसंती

विशेषतः निवृत्तीनंतर शांतता आणि निसर्गरम्य वातावरणाच्या शोधात असलेल्यांसाठी हे देश आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या शहरांत घर खरेदी करणे महाग असल्यामुळे सामान्यांसाठी ते स्वप्नवत ठरले आहे
  • भारतात वाढती महागाई, वीज, मेंटेनन्स आणि ट्रॅफिकमुळे निवृत्तीनंतर खर्चिक जीवनशैली पाळणे कठीण जाते
  • थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया आणि पोर्तुगालमध्ये कमी खर्चात उच्च दर्जाची जीवनशैली जगणे शक्य आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Same EMI Buy House Abroad: आजच्या काळात मुंबई, दिल्ली किंवा पुणे यांसारख्या शहरांत हक्काचे घर घेणे हे सामान्यांसाठी स्वप्नच उरले आहे. या शहरांत घरांचे भाव गगनाला भिडले असून, दरमहा लाखो रुपयांचा EMI भरताना नाकी नऊ येतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? जेवढा EMI तुम्ही भारतात भरता, तेवढ्याच पैशात जगातील काही सुंदर देशांमध्ये तुम्ही आलिशान बंगला खरेदी करून 'किंग साईज' आयुष्य जगू शकता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. जगातले असे काही देश आहेत जे तुम्हाला लक्झरी लाईफ देवू शकतात. शिवाय कमी खर्चात तुम्ही आयुष्य जगू शकता. अशाच देशांची आज आपण माहिती करून घेणार आहोत. 

भारतात का कठीण आहे लक्झरी लाईफ?
मुंबई किंवा पुणे दिल्ली सारख्या शहरात चांगल्या भागात फ्लॅट घ्यायचा झाल्यास कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. त्यानंतर वीज, मेंटेनन्स, ट्रॅफिक आणि वाढती महागाई यामुळे बचत करणे अशक्य होते. विशेषतः निवृत्तीनंतर (Retirement) ही खर्चिक जीवनशैली पेलणे अनेकांना कठीण जाते. म्हणूनच आता भारतीय नागरिक अशा देशांकडे वळत आहेत, जिथे राहणीमान स्वस्त आणि दर्जा उच्च आहे.

Advertisement

या देशांमध्ये मिळतेय स्वस्त आणि मस्त आयुष्य

  1. थायलंड: भारतीयांसाठी थायलंड हे सर्वात आवडते ठिकाण आहे. येथे दरमहा 1.5 ते 2 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही समुद्रकिनाऱ्याजवळ आलिशान अपार्टमेंटमध्ये राहू शकता. येथील आरोग्य सेवा उत्तम आणि स्वस्त आहे.
  2. व्हिएतनाम: कमी खर्चात हाय-क्लास लाईफ जगायचे असेल तर व्हिएतनाम उत्तम पर्याय आहे. 1 ते 1.8 लाख रुपयांत येथे मॉडर्न लाईफस्टाईल, फिरणे आणि आरोग्य सुविधांचा लाभ घेता येतो.
  3. मलेशिया: भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते वातावरण असलेल्या मलेशियामध्ये 1.5 ते 2 लाख रुपयांत सुखसोयींनी युक्त जीवन जगता येते. येथील ट्रान्सपोर्ट आणि पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत.
  4. पोर्तुगाल: जर तुम्हाला युरोपमध्ये स्थायिक व्हायचे असेल, तर पोर्तुगाल सर्वोत्तम आहे. दरमहा 2 ते 3 लाख रुपयांत एक जोडपे येथे सुरक्षित आणि सन्मानजनक आयुष्य जगू शकते.

परदेशात स्थायिक होताना या गोष्टी लक्षात घ्या
दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी तेथील व्हिसा नियम, टॅक्स सिस्टम, वैद्यकीय सुविधा आणि भाषेची माहिती घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजनामुळे तुम्ही मुंबईतील तणावपूर्ण जीवनाऐवजी परदेशात शांत आणि सुखी आयुष्य जगू शकता.
 

Topics mentioned in this article