सीबीएसई (CBSE) बोर्ड आता दहावीच्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत. 2025-26 सत्रामध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षा दोन वेळा होणार आहे. ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. CBSE नं या प्रस्तावावर 9 मार्चपर्यंत लोकांकडून सूचना मागितल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 अंतर्गत बोर्डाच्या परीक्षेत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी दिली जाणार आहे. अर्थात प्रयोग परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन हे फक्त एकदाच केले जाणार आहे.
दोन परीक्षांसाठी एकच केंद्र निश्चित केले जाईल. त्याचबरोबर परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली जाणार आहे.
( नक्की वाचा : दहावी, बारावीच्या परीक्षेत 'या' परीक्षार्थींना प्रवेश नको, नितेश राणेंची मागणी )
बोर्डाची पहिली परीक्षा 2026 मध्ये 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान होईल. तर दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.
सीबीएसईनं 2026 मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.