Budget 2024 : तरुणांसाठी मोठी घोषणा! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत दरमाह 5000 रुपये मिळणार

Budget 2024: कंपन्यांमधील इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6000 रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेचा 5 वर्षात 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तरुणांसाठी अर्थसंकल्पात आज मोठी घोषणा करण्यात आली आहे. तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्यासाठी इंटर्नशिपच्या संधी वाढवण्यासाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. 

मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

मोदी सरकारच्या 5 व्या नवीन योजनेअंतर्गत 500 मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपला संधी मिळणार आहे. सरकारच्या इंटर्नशिप योजनेचा 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारचं तरुणांना इंटर्नशीपसाठी खास पॅकेज असणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार तर आहेच, याशिवाय प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इंटर्नशिप भत्ताही दिला जाणार आहे.

इंटर्नशिपनंतर मिळणार 6 हजार रुपये

कंपन्यांमधील इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6000 रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेचा 5 वर्षात 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे.

अर्थसंकल्पातील इतर मोठ्या घोषणा

  1. पहिल्यांदा नोकरी मिळालेल्यासाठी जर पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर पहिल्यांदाच EPFO ​​मध्ये नोंदणी करणाऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल.
  2. शैक्षणिक कर्जासाठी ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या 3 टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर सुरू केले जातील, जे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.
  3. आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी रुपये आणि बिहारला 41 हजार कोटी रुपयांची मदत. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना.
  4. सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रावर आणली जाईल. 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील.
  5. मुद्रा कर्जाची रक्कम 10 लाखांवरून 20 लाख रुपये झाली. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद.
  6. सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज.