CGHS Rate Revision: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! CGHSच्या दरात मोठे बदल; काय होणार फायदे?

Central Government Health Scheme Rate Revised: केंद्र सरकारने आपल्या सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांसाठी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी (Pensioners) मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Central Government Health Scheme Rate Revised: केंद्र सरकारने आपल्या सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांसाठी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी (Pensioners) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच महागाई भत्ता (DA) वाढवल्यानंतर केंद्र सरकारने आता केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (३ ऑक्टोबर) केंद्र सरकारने सुमारे २००० वैद्यकीय प्रक्रियांच्या (Medical Procedures) पॅकेज दरांमध्ये मोठे संशोधन (Revision) केले आहे.

१५ वर्षांतील सर्वात मोठी सुधारणा:

सीजीएचएसच्या इतिहासातील गेल्या दीड दशकातील (१५ वर्षांतील) ही सर्वात मोठी सुधारणा असल्याचे सांगितले जात आहे. जुन्या दरांमुळे केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नाही, तर सीजीएचएसशी संलग्न असलेल्या (Empanelled) रुग्णालयांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. १३ ऑक्टोबरपासून हे नवीन दर आणि नियम लागू होणार आहेत.

कर्मचाऱ्यांची मोठी समस्या दूर:

केंद्रीय कर्मचाऱ्यांची आणि निवृत्तीवेतनधारकांची सर्वात मोठी तक्रार ही होती की, सीजीएचएसशी जोडलेली रुग्णालये वारंवार कॅशलेस (Cashless) उपचार देण्यास नकार देत होती. यामुळे कर्मचाऱ्यांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम खर्च करावी लागत होती आणि नंतर रिइम्बर्समेंट (पैसे परत मिळवण्यासाठी) महिनो न महिने वाट पाहावी लागत होती.

ऑगस्ट २०२५ मध्ये, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय संघाने (NFGCGEU) सरकारने या समस्येकडे लक्ष वेधले होते. आता नवीन आकर्षक दर मिळाल्याने रुग्णालये CGHS कार्डधारकांना कॅशलेस सुविधा देण्यास टाळाटाळ करणार नाहीत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे.

Advertisement

FASTag News: सर्वात मोठा दिलासा! FASTag नसला तरी दुप्पट टोल नाही; काय आहे नवीन नियम?

नवीन पॅकेज दरांचे निकष काय आहेत?

केंद्र सरकारने निश्चित केलेले हे नवीन दर शहर आणि रुग्णालयाच्या गुणवत्तेवर आधारित आहेत. त्यानुसार NABH मान्यताप्राप्त रुग्णालये बेस रेटवर सेवा देतील.बिगर-NABH रुग्णालये त्यांना बेस रेटपेक्षा १५% कमी दर मिळेल. सुपर-स्पेशालिटी रुग्णालये (२०० हून अधिक बेड): यांना बेस रेटपेक्षा १५% जास्त दर मिळेल. शहर श्रेणी टियर-II शहरांमध्ये बेस रेटपेक्षा १९% कमी आणि टियर-III शहरांमध्ये बेस रेटपेक्षा २०% कमी दर असतील.

कर्मचाऱ्यांना होणारे फायदे:

या सुधारणांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा एक सुरक्षा कवच (Safety Cover) म्हणून अधिक मजबूत होईल.

कॅशलेस उपचार सोपे: रुग्णालये आता आनंदाने कॅशलेस सुविधा देतील.

आर्थिक ताण कमी: उपचारादरम्यान खिशातून मोठी रक्कम देण्याची सक्ती कमी होईल.

रिइम्बर्समेंटची जलद प्रक्रिया: पैसे परत मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना महिनोन्महिने वाट पाहावी लागणार नाही.