उत्तर प्रदेशात रेल्वेचा अपघात की घातपात? मोटारमननं सांगितलं तेव्हा काय झालं?

Chandigarh-Dibrugarh Express Train Accident : हा अपघात झालेल्या रेल्वेच्या मोटारमननं गंभीर दाव केलाय. त्यामुळे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचा अपघात झालाय की हा घातपाताचा भाग आहे? ही चर्चा सुरु झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chandigarh-Dibrugarh Express Train Accident
मुंबई:

Chandigarh-Dibrugarh Express Train Accident : देशात रेल्वे अपघातांचं काही दिवसांपासून सत्र सुरु झालं आहे. गुरुवारी यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली. उत्तर प्रदेशातील गोंडा जवळ 15904 चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचा अपघात झाला. या अपघातामध्ये या रेल्वेचे एसी डब्बे घसरले. त्यामध्ये आत्तापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय. तर, 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हा अपघात झालेल्या रेल्वेच्या मोटारमननं गंभीर दाव केलाय. त्यामुळे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचा अपघात झालाय की हा घातपाताचा भाग आहे? ही चर्चा सुरु झाली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोटारमननं केलेल्या दाव्यानुसार त्यानं अपघात होण्यापूर्वी स्फोटाचा आवाज ऐकला. अर्थात रेल्वेकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. या अपघातानंतर मेडिकल आणि आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळे हेल्पलाईन नंबरही देण्यात आले आहेत. या अपघातानंतर या मार्गावरच्या 2 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर 11 रेल्वेंचा मार्ग बदलण्यात आलाय. 

रेल्वे मंत्रालयाकडून मदतीची घोषणा

रेल्वे मंत्रालयानं या अपघातामधील जखमी तसंच मृत कुटुंबीयांसाठी मदत जाहीर केली आहे. या अपघातामधील मृत कुटुंबासाठी 10 लाख रुपये, गंभीर जखमींसाठी 2.5 लाख रुपये तर किरकोळ जखमींसाठी 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रेल्वे रुळावरुन घसरली; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी )
 

'या' नंबरवर करा फोन

रेल्वे प्रशासनानं ट्विट करत या अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी अनेक नंबर जाहीर केले आहेत. 957555984, 9957555966, 6001882410, 8789543798, 9957555959, 9957555960, 0361-2731621,0361-2731622, 0361-2731623 या नंबरवर फोन करुन तुम्ही या अपघाताशी संबंधित पीडित तसंच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊ शकतो. 

Advertisement