शिवरायांचा पुतळा कोसळला, मोठी कारवाई, फरार चेतन पाटीलला 'अशा' ठोकल्या बेड्या

पुतळा ज्याने बनवला तो जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील हे दोघेही फरार होते. गेल्या चारा दिवसापासून सिंधुदुर्ग पोलीस या चेतन पाटील याचा शोध घेत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोटवर कोसळला. त्यानंतर हा पुतळा ज्याने बनवला तो जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील हे दोघेही फरार होते. गेल्या चारा दिवसापासून सिंधुदुर्ग पोलीस या चेतन पाटील याचा शोध घेत होते. तो मुळचा कोल्हापूरचा आहे. त्यामुळे पोलीसही कोल्हापूरमध्ये तळ ठोकून होते. त्याचे दोन ही फोन बंद असल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. शिवाय त्याच्या कोल्हापुरातल्या राहत्या घरून त्याचे कुटुंबीयही गायब झाले होते. त्यामुळे चेतन पाटील याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर चार दिवसानंतर पोलीसांनी मध्यरात्री चेतनला कोल्हापुरातूनच बेड्या ठोकल्या आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटे याच्या कंपनीने घेतले होते. याचा बांधकाम सल्लागार हा चेतन पाटील होता. हा पुतळा कोसळल्यानंतर या दोघां विरोधात गुन्हाही दाखल झाले. त्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. त्यांचा तपास लागत नव्हता. या दोघांच्या ही मागावर पोलीस होते. मालवण पोलीसांनी या दोघां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्या पैकी चेतन पाटील हा कोल्हापुरचा रहिवाशी आहे. त्यामुळे मालवण पोलीसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले होते. पण तिथे चेतन पाटील सापडला नाही. तोफरार झाला होता.  त्यामुळे गेली चार दिवस हे पथक कोल्हापुरमध्येच होते. 

ट्रेंडिंग बातमी - ते थरारक 48 तास! पुराच्या पाण्यात अडकली भारतीय महिला क्रिकेटपटू, सुटकेसाठी काय केलं?

त्याच वेळी चेतन पाटील याने आपले मोबाईल बंद करून ठेवले होते. त्यामुळे त्याला शोधणे आणखी कठीण होवून बसले. पण पोलीसांची बारीक नजर प्रत्येक गोष्टीवर होती. या घटनेनंतर त्याच्या घरातले सर्व जण फरार झाले होते. मात्र कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या राहात्या घरी चेतन मध्य रात्रीच्या सुमारास आला होता. त्यावेळी पोलीस त्याच्यावर नजत ठेवून होते. जसा तो घरात घुसला तशी पोलीसांनी त्यावर झडप टाकली. मध्य रात्री तीनच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. 

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

चेतन पाटील हा बांधकाम सल्लागार आहे. तो पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेच्या संपर्कात होता. या पुतळ्याचे काम जयदीप आपटेच्या कंपनीला मिळाले होते. त्यानंतर त्याचा बांधकाम सल्लागार म्हणून याच चेतन पाटील याने काम पाहीले. हाच चेतन पाटील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम करतो. या महाविद्यालयाशीही पोलीसांनी संपर्क केला होता. पण तो तिथेही सापडला नाही. चेतन हा बांधकाम सल्लागार असल्याने त्याच्याकडून हा पुतळा उभारताना मोठी चुक झाली आहे. चौकशीत हे आता स्पष्ट होणार आहे.   

Advertisement