Crime News: मुख्यध्यापकाकडून लैंगिक छळ; विद्यार्थिनीने लायब्ररीतच जीवन संपवलंं; सुसाईड नोटमध्ये काय?

सुसाईड नोटमध्ये मुख्याध्यापकावर छेडछाड, लैंगिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केला आहे. मुख्याध्यापकाच्या या कृत्यांमुळेच ती अंतिम पाऊल उचलण्यास मजबूर झाली, असे तिने नमूद केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु-शिष्याचे पवित्र नाते जपणारी शाळाच आता सुरक्षित राहिलेली नाही. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एका खासगी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक छळ आणि *मानसिक त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या अभ्यासिकेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बगीचा पोलीस स्टेशन परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

घटना काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शाळेच्या अभ्यासिकेत फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती बगीचा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तपास सुरू केला. त्यावेळी मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

(नक्की वाचा - Crime News :शरीर संबंधादरम्यान अडचण...; उपचार घेताना सॉफ्टवेअर इंजिनियरच्या शरीरात भयंकर घडलं, 48 लाखही बुडाले)

मुख्याध्यापकावर छळाचे गंभीर आरोप

सुसाईड नोटमध्ये मुख्याध्यापकावर छेडछाड, लैंगिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केला आहे. मुख्याध्यापकाच्या या कृत्यांमुळेच ती अंतिम पाऊल उचलण्यास मजबूर झाली, असे तिने नमूद केले आहे.

तातडीने गुन्हा दाखल आणि अटक

मुख्याध्यापकाकडून झालेल्या छळाची ही घटना उघडकीस येताच, जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisement

आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Topics mentioned in this article