Naxal Encounter : सुरक्षा दलाला मोठं यश, बालेकिल्ल्यात घुसून केलेल्या कारवाईत 17 नक्षलवादी ठार

Naxal Encounter : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आत्तापर्यंत 17 जण ठार झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी

Naxal Encounter : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आत्तापर्यंत 17 जण ठार झाले आहेत. छत्तीसगडमधील बीजापूर आणि तेलंगणाच्या सिमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांंमध्ये चकमक झाली. त्यामध्ये सुरक्षा दलाला हे यश मिळालं. हा सर्व परिसर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जात होता. याच भागात आता सुरक्षा दलानं त्यांचं अभियान तीव्र केलं आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील तीन जिल्ह्यात ही चकमक सुरु आहे. विजापूरच्या मरुधबाका आणि पुजारी कांकेर परिसरात सकाळी 9 वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

माओवाद्यांच्या मोठ्या कॅडरच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, DRG विजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनची संयुक्त टीम कार्यरत आहे.

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
 

गुरुवारी बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात  सीआरपीएफ कोब्रा केडरचे दोन जवान जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या एका संयुक्त टीमनं बासागुडा पोलीस स्टेशनच्या परिसरार वर्चस्व अभियान सुरु केलं आहे. या अभियानास सीआरपीएफची 229 बटालियन आणि सीबीआयमधील कोब्रा कमांडो पथकाचे 206 जवान सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुरुवातीला जवान अनावधानानं प्रेशर आयईडीच्या संपर्कात आले. त्यानंतर स्फोट झाला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले. 

Advertisement

बिजापूर जिल्ह्यातील मद्देड स्टेशन परिसरात 12 जानेवारी रोजी सुरक्षादलसोबत झालेल्या चकमकीत 2 महिलांसह पाच माओवादी मारले गेले. गेल्या वर्षात राज्यात झालेल्या वेगवेळ्या चकमकीत 219 नक्षलवादी ठार झाले आहेत.