रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Mamta Banerjee In Supreme Court : पश्चिम बंगाल मधील विशेष गहन पुनरावृत्ती (Special Intensive Revision) संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वकीली कोट घालून स्वत: युक्तीवाद केला. एसआयआर संदर्भात पश्चिम बंगालवर अन्याय केला जात असून लोकशाही वाचवा,असा युक्तीवाद करत ममता बॅनर्जी यांनी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली. बॅनर्जी यांनी या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात कोणते मुद्दे उपस्थित केला आणि त्यावेळी नेमका काय युक्तीवाद झाला? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
एसआयआर सुनावणीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत आल्या होत्या. त्या सकाळी लवकर सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या. परंतु सुनावणीला उशीर झाला. सव्वा दोन तासांच्या प्रतिक्षोनंतर पश्चिम बंगाल एसआयआर बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.ममता बॅनर्जी यांच्याकडून शाम दिवाण यांनी युक्तीवादाला सुरूवात केली. त्यावेळी ममता बॅनर्जी पहिल्या रांगेत उभ्या होत्या.
बॅनर्जींचे वकील ॲड शाम दिवाण यांनी न्यायालयात म्हटलं की, "अंतिम मतदार यादी जारी होण्यासाठी 11 दिवस शिल्लक आहेत.14 फेब्रुवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि सुनावणी पूर्ण होण्यास 4 दिवस शिल्लक आहेत. अनमॅप्ड मतदारांची संख्या 32 लाख आहे.1.36 कोटी नाव लॅाजिकल डिस्क्रेपेंसी यादीत आहे. एकूण मतदार 20 टक्के आहेत.63 लाख सुनावणी अजून प्रलंबित आहेत. सध्या 1.8 लाख सुनावणींचा प्रतिदिन निपटारा केला जात आहे.वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज 15.5 लाख सुनावणी होणं आवश्यक आहे. 8300 मायक्रो ॲाब्जर्वर कोणत्याही आधाराविना तैनात आहेत. नोटीस पाठवण्यास उशीर होतोय.अनेक प्रकरणात नोटीस मिळाले तरी कारण स्पष्ट नसते. सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी प्रश्न उपस्थित केला की, समजा आडनावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर दत्ता ऐवजी शर्मा झाले तर?
नक्की वाचा >> घरकाम करणाऱ्या मुलीला बेडमध्ये लपवायचे, नंतर तिच्यासोबत करायचे घाणेरडा प्रकार, Video आला समोर
ममता बॅनर्जींनी कोर्टात काय युक्तीवाद केला?
एसआयआर प्रकरणावर ममता बॅनर्जी यांनी स्वतः युक्तिवाद केला. ममता बॅनर्जी युक्तिवाद करत म्हणाल्या, "आम्हाला न्याय मिळत नाहीये. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली आहे.पण मी माझ्या पक्षासाठी लढत नाहीये.जेव्हा वकील सुरुवातीपासूनच लढत असतात. मुद्दे वारंवार रेकॉर्डवर ठेवले जातात.निवडणूक आयोगाला सहा पत्रे लिहिली गेली आहेत आणि एकही उत्तर मिळालेले नाही. मागच्या दाराने कुठेतरी न्याय अडकला आहे असे वाटणे स्वाभाविक आहे.ममतः मला पाच मिनिटे द्या". यावर सरन्यायाधील सुर्यकांत म्हणाले,"आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही तुम्हाला 15 मिनिटे देऊ पण आधी आमचे ऐका.प्रत्येक समस्येचे निराकरण असते.आम्ही या समस्येवर देखील उपाय शोधू.तुमचे राज्य सरकार देखील येथे आहे.तुमचा पक्ष देखील येथे आहे.तुमच्याकडे देशातील सर्वात ज्येष्ठ वकील उपस्थित आहेत.तुम्ही उपस्थित केलेल्या चिंता आम्ही मान्य केल्या आहेत .त्या रेकॉर्डवर आहेत.पण प्रत्येक समस्येचे निराकरण असते".त्यानंतर वकिलांनी वाद घालायला सुरुवात केली.
यावेळी ममता म्हणाल्या, मला बोलू द्या आणि आधी बोलणे संपवा.मला काही फोटो शेअर करायचे आहेत.सर्व बंगाली वर्तमानपत्रांनी ते प्रकाशित केले आहेत.आम्हाला समस्येवर तोडगा हवा आहे. आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही.ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे यावर आम्ही सहमत आहोत. भाषेतील अडथळे किंवा नावांच्या जुळणाऱ्या स्पेलिंगमुळे मतदार यादीतून कोणालाही वगळावे,असे आम्हालाही वाटत नाही.काही मुली लग्नानंतर त्यांच्या सासरच्या घरी गेल्या आहेत. परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केलेली नाहीत. निवडणूक आयोग तुमच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे. अनेक बीएलओ मरण पावले आहेत. बंगालला लक्ष्य केले जात आहे,आसाम का नाही? असा प्रश्नही ममता यांनी उपस्थित केला.
त्यानंतर सनन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले,"मॅडम ममता,तुमच्या शाम दिवाण या वकिलाच्या क्षमतेबद्दल शंका नाही.तुम्ही खूप चांगला वकील निवडला आहे. त्यांना युक्तिवाद करू द्या.आम्ही सोमवारी खटल्याची सुनावणी करू.आम्हाला विश्वास आहे की आम्ही एक प्रॅक्टिकल उपाय शोधू.फक्त बंगालसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.बंगालला लक्ष्य केले जात आहे". त्यानंतर ममता हात जोडून म्हणाल्या, "लोकशाही वाचवा.बंगालला बुलडोझ करण्याचा प्रयत्न".ममतांच्या याचिकेवर नोटीस जारी केली. आता पुन्हा सोमवारी सुनावणी होणार आहे.