महिलांवरील अत्याचार आणि अन्यायाच घटना कमी होण्याचे नाव घेतले जात नाही. चित्रकूटमधील देवांगना भागातील जंगलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं फिरायला गेलेल्या एका 20 वर्षीय युवतीवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीने तसा आरोप केला आहे.उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून तरुणी ही मध्य प्रदेशातील आहे. पोलीस प्रशासनात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अत्याचार झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. विशेष म्हणजे या आरोपींनी आपण वन अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.
मध्य प्रदेशातील नयागाव येथील ही युवती आहे. तिचं वय जेमतेम 20 वर्ष आहे. ती तिच्या 17 वर्षीय मित्रासोबत देवांगना परिसरातील जंगलात फिरण्यासाठी गेली होती. तिला जंगलातले काही फोटो घ्यायचे होते. शिवाय निसर्गाचा आनंद घ्यायचा होता. या उद्देशाने ती जंगलात गेली होती. पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची तिला पुसटती कल्पना ही नव्हीत. सायंकाळची वेळी होती. त्याच वेळी दुचाकीवरून तीन तरुण तिथे आले. त्यांनी आपली ओळख वन अधिकारी असल्याचे सांगितले. शिवाय या ठिकाणी काय करत आहात अशी विचारणा ही केली.
त्यानंतर हे तिघे ही या दोघांना धमकावत होते. त्यांना घाबरवत होते. या वेळी तरुणीने आणि तिच्या मित्राने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्या तिघा समोर या दोघांचे काही चालले नाही. त्याती दोन जणांनी त्या तरुणीला जंगलात झाडीमध्ये नेले. त्यानंतर आळीपाळीने दोघांनी ही तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिसरा तरुणी हा धमकावण्याचेच काम करत होता. त्याने तिच्या मित्राला धरून ठेवले होते. तर ते दोघे जण तिच्यावर त्याच वेळी अत्याचार करत होते. वारंवार अत्याचार केल्यानंतर त्या नराधम तरुणांनी तिथून पळ काढला.
घटना घडल्यानंतर तरुणी आणि तिचा मित्र हादरून गेला होता. त्यांनी स्वत: ला सावरत जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. त्यानंतर पीडितेने तात्काळ पोलिसांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस ही या घटनेनं हादरून गेले आहेत. चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या सांगण्यावरून आरोपींचे स्केच तयार करण्यात आले आहे. शिवाय हे स्केच सगळीकडे वाटण्यात ही आले आहे. आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क ही कामाला लावण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे.