गुजरातमधील पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट आणि सहवैमानिकाचा समावेश आहे. रविवारी दुपारी गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) हेलिकॉप्टर लँडिंग करताना क्रॅश झाले. त्यात तीन क्रू मेंबर्स ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथ सिंह जडेजा यांनी सांगितले की, ही घटना दुपारी 12.10 वाजता घडली. पोरबंदर विमानतळावर लँडिंग दरम्यान ICG चे हेलिकॉप्टर (ALH) क्रॅश झाले. ज्यामध्ये तीन क्रू मेंबर्स प्रवास होते.