Corona Update : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासांत 511 नवीन रुग्णांची नोंद देशभरात झाली आहे. तसेच कोरोनामुळे 7 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात दिल्लीतील एका रुग्णाच्या मृत्यूचा समावेश आहे. यावर्षी दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 467 सक्रिय रुग्ण आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीत गेल्या 24 तासांत 56 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या दिल्लीत कोरोनाचे एकूण 294 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 214 लोक बरे झाले आहेत. या वर्षी दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत कोरोनामुळे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
( नक्की वाचा : Ashadhi Wari : विम्याचा लाभ, टोलमाफी, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं घेतले मोठे निर्णय )
देशभरातील कोरोनाची आकडेवारी
राज्य | कोरोनाच्या रुग्णांची संख्या |
दिल्ली | 294 |
केरळ | 1147 |
महाराष्ट्र | 424 |
गुजरात | 223 |
तमिलनाडू | 148 |
कर्नाटक | 148 |
पश्चिम बंगाल | 116 |
राजस्थान | 51 |
उत्तर प्रदेश | 42 |
पुदुचेरी | 35 |
हरियाणा | 20 |
आंध्र प्रदेश | 16 |
मध्य प्रदेश | 10 |
छत्तीसगड | 3 |
गोवा | 7 |
तेलंगाणा | 3 |
ओदिशा | 4 |
पंजाब | 4 |
जम्मू-कश्मीर | 4 |
मिझोरम | 2 |
अरुणाचल प्रदेश | 3 |
आसम | 2 |
चंदिगढ | 3 |
कोरोनाचा धोका कमी
एम्सचे माजी संचालक डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं की, कोरोनाचा JN.1 प्रकार सर्वाधिक पसरत आहे. मात्र घाबरण्याचे कारण नाही. या प्रकारात रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे, परंतु धोका गंभीर नाही. कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. याचा अर्थ संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या व्हेरिएंटमध्ये आढळणारी लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता कमी आहे.
(नक्की वाचा- Ayush Suraksha : आयुर्वेदाच्या नावाखाली कंपन्या आता लोकांना मूर्ख बनवू शकणार नाहीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या 24 तासांत दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
4 दिवसांत 2700 कोरोना रुग्ण वाढले
26 मे पर्यंत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 1010 होती, जी 30 मे रोजी 2710 वर पोहोचली. चार दिवसांत 1700 रुग्णांची वाढ दिसून आली आहे.