Sitaram Yechury Passes Away : माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं निधन

Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच निधन झालं आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. नवी दिल्लीमधील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी  एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 

येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते. अनेक दिवसांपासून डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते, मात्र त्याला वाचवता आले नाही.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च संस्था असलेल्या पॉलिट ब्युरोचे येचुरी तीन दशक सदस्य होते. 2005 ते 2017 या कालावधीमध्ये राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सीताराम येचुरी यांनी 1974 साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये (SFI) प्रवेश केला. एक वर्षानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचं (मार्क्सवादी) सदस्यत्व घेतलं. त्यांची 1977-78 साली नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. येचुरी केरळ आणि बंगालच्या बाहेरचे SFI चे पहिले अध्यक्ष होते. 

Advertisement

( नक्की वाचा : भारताविरोध ते सख्ख्या भावाशी लग्नाचा आरोप... राहुल गांधी अमेरिकेत भेटले त्या Ilhan Omar कोण आहेत? )
 

चेन्नईत जन्म, हैदरबाद आणि JNU मध्ये शिक्षण

सीताराम येचुरी यांचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 12 ऑगस्ट 1952 रोजी झाला होता. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबादमध्ये झालं. नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. तर जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधून (JNU) पदव्युत्तर शिक्षण घेतलं. येचुरी यांनी अर्थशास्त्रामध्ये MA केलं होतं. त्यांनी पीएचडीसाठी JNU मध्ये प्रवेशही घेतला. पण, 1975 साली लागू झालेल्या आणिबाणीमध्ये त्यांना अटक झाली. त्यामुळे ते प्रबंध पूर्ण करु शकले नाहीत. सीमा चिश्ती यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं होतं. 

Topics mentioned in this article