माथेफिरुने दारुच्या नशेत पाच जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात धमदाहा परिसरात ही घटना घडली आहे. माथेफिरु तरुणाने आपल्या पिकअप गाडीने अनेकांना उडवलं. घटनेत दोघांनी जागीच जीव गमावला. तर तीन जणांना उपचारादरम्ययान मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घटनेत अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी फरार असून, ओळख पटल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्योतिष ठाकूर, संजीता देवी, मनीषा कुमारी, अखिलेश मुनी, अमरदीप कुमार अशी मृतांची नावे आहेत.
(नक्की वाचा- Air India Flight : प्रवासी विमानातचं 'झिंगाट'; 4 तासांच्या प्रवासात अख्खी दारु रिचवली, स्टॉकच संपला)
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री डोकवा गावातील एक तरुण दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. गावातील काही लोकांनी त्याला फटकारले आणि पळवून लावले. गावकऱ्यांनी त्याला येथून जाण्यास सांगितले. यावरून वाद वाढत गेला, त्यानंतर माथेफिरू घरी निघून गेला. घरी पोहोचल्यानंतर त्याने पिकअप गाडी सुरू केली आणि वेगाने आणली.
(नक्की वाचा- Pune Accident: पुण्यात हिट अँड रन! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3 जण ठार)
रस्त्याच्या कडेला जे दिसतील त्यांना आरोपींने उडडले. या घटनेनंतर डोकवा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. 2 जखमींना मायागंज रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.