आज फादर्स डे आहे. या निमित्ताने आपण आज अशी एक बातमी वाचणार आहोत, ज्यामुळे तुम्हालाही या बातमीतल्या बाप लेकीचा अभिमान वाटेल. तेलंगणाच्या सुर्यापेटच्या हुजूरनगरात असलेल्या सिताराम नगर कॉलनीत हे बाप -लेक राहातात. या दोघांची गोष्टही खरोखरच स्वप्नवत आहे. या बाप लेकीचा एक फोटो सध्या सोशल मीडियवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी बाप आपल्या लेकीला सलाम ठोकत आहे. या मागची गोष्ट ही अतिशय हृदयस्पर्शी आहे. या फोटोमध्ये सलाम ठोकणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे एन. वेंकटेश्वरलू. ते आपल्या IAS मुलीला सॅल्यूट ठोकत आहेत. त्यांची मुलगी उमा हरथी 2022 च्या बॅचची टॉपर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बापाला लेकीचा अभिमान
उमा या तेलंगणा पोलिस अकादमीत आल्या होत्या. त्यावेळी तिथे त्यांचे वडिल वेंकटेश्वरलू उपस्थित होते. त्यांनी मुलीली तिथे पाहाताच ते भावूक झाले. त्यानंतर अचानक समोर आलेल्या आपल्या मुलीला सॅल्यूट मारला. त्यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IAS असलेल्या उमा यांची सुरवातीचे शिक्षण तेलंगणातच झाले. तर त्यांचे वडिल नारायणेटचो पोलिस अधिक्षक आहेत. IPS असलेल्या आपल्या वडिलांपासून उमा ह्या खूप प्रभावीत झाल्या होत्या. त्यानंतर आपणही IAS किंवा IPS व्हायचं असे स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. शेवटी पाचव्या प्रयत्नात त्या IAS झाल्या.
IIT ते IPS पर्यंतचा प्रवास
IAS असलेल्या उमा या तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील आहेत. उमार हरथी यांनी हैदराबाद आयआयटीतून सिव्हील इंजिनिअरची पदवी घेतली आहे. इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी IAS ची तयारी सुरू केली. अधिकारी होवून समाजाची सेवा करायची अशी त्यांची इच्छा होत्या. त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केले. चार वेळा त्यांनी परिक्षा दिली पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. पण त्यांनी हिंमत सोडली नाही. मेहनत सुरूच ठेवली. शेवटी पाचव्या प्रयत्नात त्यांनी IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
वडिलांनी दिले लेकीला प्रोत्साहन
उमा यांनी स्पर्धा परिक्षा द्यावी यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. आयएएस होणे ही मोठी गोष्टी आहे. त्या पदावर राहून अनेक चांगल्या गोष्टी करणे शक्य आहे असे त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमीच सांगितले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडूनही प्रोत्साहन मिळाले. आपले स्वप्न पुर्ण करायचे यासाठी त्या अथक प्रयत्न करत राहील्या. इंजिनिअर असतानाही त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहीले. संघर्ष केला. तरीही सुरूवातीला अपयश पदरात पडले. त्यातून काय चुका झाल्या त्या त्यांनी सुधारल्या. त्यातूनच शेवटी त्यांनी यशाचे शिखर गाठले.
उमा नक्की काय म्हणाल्या?
उमा हरथी यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की एका क्षणात तुमचे आयुष्य कसे बदलते. त्या सांगतात माझा हा स्पर्धा परिक्षेचा पाचवा प्रयत्न होता. हा प्रवास खूप मोठा होता. शिवाय तो सोपाही नव्हता. पण त्यातून अनेक गोष्टी शिकायला जरूर मिळाल्या. पहिल्या चार प्रयत्नात ज्या चुका झाल्या त्या शोधल्या आणि त्या सुधारण्यावर भर दिला असंही त्यांनी सांगितलं. जे स्पर्धा परिक्षा देत आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट स्विकारली पाहिजे. यात अनेक चढ उतार असतात. चुका होता. त्या सुधारण्याची आणि समजण्याची गरज आहे. जरी तुम्हाला यश मिळाले नाही तरी तुम्ही जगाचा मुकाबला करण्यासाठी तयार होत असता असेही त्यांनी स्पष्ट केले.