दिल्लीची हवा बनली जीवघेणी, अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता घातक स्तरावर

दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) च्या नुसार आज राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या स्तरावर पोहोचला आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
दिवाली के बाद दिल्ली की हवा बेहद खराब.

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

दिवाळीच्या रात्री दिल्लीची हवा पुन्हा एकदा अत्यंत वाईट पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीत फटाक्यांवर बंदी असून देखील त्याचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आले. गुरुवारी दिवाळीच्या रात्री दिल्लीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले, त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट स्थितीत आहे. प्रदूषण इतके वाढले आहे की श्वास घेणे कठीण झाले आहे. सर्वत्र धुराचे ढग आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) च्या नुसार आज राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या स्तरावर पोहोचला आहे.  

Latest and Breaking News on NDTV

आनंद विहार इथं AQI 419 पोहोचला आहे. जेएलएन स्टेडियम मध्ये AQI 374 वर पोहोचला, जो अतिशय खराब श्रेणीत आहे. तर जहांगिरपुरी आणि द्वारका इथला AQI 395 इतक्या  खराब स्तरावर पोहोचला आहे.

(नक्की वाचा-  कोंडीत मुंबईतील 22 किलोमीटरचे अंतर 19 मिनिटात पार, रुग्णाला मिळालं जीवनदान)

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा-  योजना बंद झाली तर? विरोधकांच्या आरोपांना जाहिरातीद्वारे उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न)

एअर क्वालिटी इंडेक्स च्या हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण कसं ओळखावं?

  • एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50 : उत्तम हवा
  • एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100 : चांगली हवा
  • एअर क्वालिटी इंडेक्सः 101 ते 200 : मध्यम हवा
  • एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यान : खराब हवामान
  • एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यान : हवा अत्यंत खराब
  • एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वर : मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक