दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक सतत घसरत असल्याने हवा विषारी बनत आहे. अनेकांना प्रदूषित हवेचा त्रास होता आहे. दरम्यान नासाने (NASA) सॅटलाईट फोटो जारी करत पंजाब आणि हरियाणामधील पेंढा जाळण्याच्या स्थितीचा शोध घेतला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंजाब आणि हरियाणामधील पेंढा जाळण्याच्या घटनांमुळे दिल्लीतील वायू प्रदूषणात मोठी वाढ होते. पेंढा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध पावलं उचलली गेली आहेत. मात्र त्यावर पूर्णपणे नियंत्रण करणे शक्य झालेलं नाही. दिल्लीत आधीज वायू प्रदूषणाची मोठी समस्या आहे. त्यात आता पेंढा जाळण्याच्या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नासाने जारी केलेल्या लाईव्ह फायर मॅपमध्ये पंजाब आणि हरियाणामधील भीषण आग दाखवली गेली आहे. यामुळे या परिसरातील वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे.
( नक्की वाचा : '.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा )
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नासाच्या उपग्रहांना आग आणि धुराचे ढग आढळून आले आहेत. पंजाब, उत्तर भारत आणि अगदी पाकिस्तान यांसारख्या दाट लोकवस्तीचे भाग यामुळे प्रभावित होतात. पंजाबमधील शेतकरी अनेकदा गव्हाच्या कापणीनंतर उरलेला पेंढा जाळतात. ही सोपी पद्धत असली तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
(नक्की वाचा- जेव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास)
दिल्लीतील हवा प्रदूषणाची स्थिती
केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राजधानी दिल्लीतील सरासरी हवेचा दर्जा निर्देशांक 349 अंकांवर होता. तर गाझियाबादमध्ये 276, ग्रेटर नोएडामध्ये 289 आणि नोएडामध्ये 269 अंकांवर होता. दिल्लीच्या आया नगरमध्ये सध्या सर्वाधिक 406 AQI आहे.