2 months ago

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ शक्तीशाली स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  24 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत सर्व लाईव्ह अपडेट पाहा एका क्लीकवर 

Nov 10, 2025 22:33 (IST)

Live Update: I 20 कारच्या मालकाला पोलीसांनी घेतले ताब्यात

Live Update: दिल्ली स्फोटात वापरलेली  I 20 कारच्या मालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान असे त्याचे नाव आहे. ही कार आपण विकली असल्याचं त्याने चौकशीत सांगितलं आहे. आता ही कार त्याने कोणाला विकली याची चौकशी केली जाणार आहे.  

Nov 10, 2025 22:29 (IST)

Delhi blast Live Update: दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Delhi blast Live Update:  दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर  20 जण जखमी

Nov 10, 2025 22:26 (IST)

Live Update: अमित शहा घटनास्थळी पोहोचले, केली पाहाणी

Nov 10, 2025 22:18 (IST)

Live Update: दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू - अमित शहा यांची माहिती

Advertisement
Nov 10, 2025 22:14 (IST)

Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्फोट झाला त्या ठिकाणी पोहोचले

Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्फोट झाला त्या ठिकाणी पोहोचले आहेत. ते तिथे परिस्थितीचा आढवा घेणार आहेत. 

Nov 10, 2025 22:11 (IST)

Live Update: स्फोटात वापरलेली कार हरियाणातली

Live Update: दिल्ली  स्फोटात वापरलेली कार हरियाणातली असल्याचं समोर आलं आहे. नदीम खान या व्यक्तीच्या नावाने ही कार रजिस्टर होती. तपासाची चक्र आता वेगाने फरत आहेत.   

Advertisement
Nov 10, 2025 21:59 (IST)

Live Update: अमित शहा यांनी केली जखमींची विचारपूस

Nov 10, 2025 21:53 (IST)

Live Update: दिल्ली स्फोटानंतर राहुल गांधी काय म्हणाले?

Advertisement
Nov 10, 2025 21:48 (IST)

Live Update: दिल्ली मेट्रो इथं दिल्ली क्राईम ब्रँचची टीम पोहोचली

Nov 10, 2025 21:45 (IST)

Live Update: दिल्ली ब्लास्टनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रीया

Nov 10, 2025 21:40 (IST)

Live Update: अमित शहा यांनी केली डॉक्टरांशी चर्चा

Nov 10, 2025 21:35 (IST)

Live Update: अमित शहा LNJP रुग्णालयात दाखल

Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा LNJP रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते जखमींची विचारपूस करतील. शिवाय डॉक्टरांबरोबर ही चर्चा करणार आहेत.  

Nov 10, 2025 21:34 (IST)

Live Update: स्फोटात वापरलेली गाडी हरियाणातली

Live Update: स्फोटात i 20 ही कार वापरण्यात आली होती. ही गाडी हरियाणातली असल्याचं समोर येत आहे.  

Nov 10, 2025 21:29 (IST)

Live Update: अमित शहा थोड्याच वेळात घटनास्थळी जाणार

Live Update:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात घटनास्थळी जाणार आहेत. शिवाय ते लोक नायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाला ही भेट देणार आहेत. इथं जखमींवर उपचार केले जात आहे. घटनास्थळी जाणार असल्याचं शहा यांनी स्वत: सांगितलं आहे.  

Nov 10, 2025 21:26 (IST)

Live Update: अमित शहा यांची पहिली प्रतिक्रीया काय?

Nov 10, 2025 21:25 (IST)

Live Update: स्फोटानंतर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रीया

LIVE Update:  ब्लास्टमुळे अजूबाजूच्या गाड्यांचे नुकसान झाले. काही लोकांचा यात मृत्यू झाला आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ब्लास आय २० या कारमध्ये झाला. ब्लास्ट झाल्यानंतर दहा मिनिटात दिल्ली पोलीस स्पॉटवर पोहोचली. एनएसी एनआयएची टीम ही तिथे पोहचल्या. त्यांनी तपास सुरू केला आहे. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. मी आयुक्तांसोबत बोललो आहे. सर्व अधिकारी स्पॉटवर आहेत. आम्ही सर्व संभावना तपासून पाहात आहोत. सर्व प्रकारचा तपास होईल. सर्व जनते समोर ठेवू असं शहा म्हणाले.  

Nov 10, 2025 21:19 (IST)

Live Update: स्फोटा ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या सापडल्या

Live Update: स्फोटा ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे स्फोटा आधी तिथे गोळीबार झाला की याचाही आता तपास केला जाणार आहे. 

Nov 10, 2025 21:17 (IST)

Delhi blast Live Update: दिल्ली स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Delhi blast Live Update:  दिल्ली स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. सुरूतीला पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर तो आकडा आठवर गेला. त्यानंतर तो दहा झाला. आता मृतांचा आकडा तेरावर पोहोचला आहे. 

Nov 10, 2025 21:13 (IST)

Live Update: NIA ची घटनास्थळी दाखल

Live Update:  ज्या लाल किल्ल्या समोर स्फोट झाला त्या ठिकाणी NIA ची टीम दाखल झाली आहे. हा स्फोट कशाचा होता याचा तपास ते करतील.  

Nov 10, 2025 21:07 (IST)

Live Update: ब्लास्ट I20 कार मध्ये झाला

Live Update: हा ब्लास्ट I20 कार मध्ये झाला.  कारच्या मागच्या बाजूस हा कार झाल्याचं ही आता समोर येत आहे.  ही कार कोणाची होती हे अजून स्पष्ट झाले नाही. त्या कारची नंबर प्लेट शोधण्याचे काम सुरू आहे. 

Nov 10, 2025 20:58 (IST)

Delhi blast Live Update: दिल्ली स्फोट दहशतवाद्यांचाच कट, सुत्रांची माहिती

Delhi blast Live Update:  दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट दहशतवाद्यांचाच कट असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांची माहिती आहे. या स्फोटाचा आवाड जवळपास दोनशे मिटर लांब पर्यंत ऐकला गेला आहे. ही एक मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं ही बोललं जात आहे. हा सामान्य स्फोट नव्हता असं दिल्ली पोलीसांनीही स्पष्ट केलं आहे.   

Nov 10, 2025 20:54 (IST)

Live Update: अमित शाह यांनी चौकशी अहवाल मागवला

Live Update: दिल्ली स्फोटाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशी अहवाल मागवला आहे. चौकशी नंतर हा अहवाल तातडीने सादर करावा अशी सुचना त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिला आहे. दरम्यान याबाबतची माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  

Nov 10, 2025 20:47 (IST)

Delhi blast Live Update: दिल्ली स्फोटात 10 जणांचा मृ्त्यू तर 30 जण जखमी, डॉक्टरांची माहिती

Delhi blast Live Update:  दिल्ली स्फोटात 10 जणांचा मृ्त्यू तर 30 जण जखमी, डॉक्टरांची माहिती, जखमींना लोक नायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी किती जखमी आणि किती मृत याबाबत माहिती दिली. त्यानुसार मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

Nov 10, 2025 20:43 (IST)

Live Update: फॉरेन्सीकची टीम स्फोट झाल्या ठिकाणी दाखल

Nov 10, 2025 20:41 (IST)

Live Update: धावत्या कारमध्ये स्फोट झाल्याची पोलीसांची माहिती

Live Update:  धावत्या कारमध्ये स्फोट झाल्याची पोलीसांची माहिती आहे. हा स्फोट लाल किल्ल्या बाहेर झाला आहे. दिल्ली पोलीसांनी याबाबतची माहिती दिली आहे.  

Nov 10, 2025 20:40 (IST)

Live Update: दिल्ली पोलीसांची पहिली प्रतिक्रीया

Nov 10, 2025 20:37 (IST)

Live Update: स्फोटानंतर पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहांना केला फोन

Live Update:  दिल्ली  स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहांना फोन केला आहे. त्यांनी शहा यांच्याकडून स्फोटाची माहिती घेतली आहे. शिवाय हा स्फोट कसा झाला हे ही त्यांनी जाणून घेतलं आहे.  

Nov 10, 2025 20:36 (IST)

Live Update: स्फोटात गाडीचे तुकडे तुकडे झाले

Nov 10, 2025 20:35 (IST)

Live Update- स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शी नक्की काय म्हणाले ऐका

Nov 10, 2025 20:34 (IST)

LiveUpdate: स्फोटानंतर गृहमंत्र्यांनी घेतला तातडीने आढावा

Nov 10, 2025 20:33 (IST)

LIVE Update: NIA ची टीम घटनास्थळी दाखल

LIVE Update: NIA ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट लाल किल्ल्या जवळ झाला आहे. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. 

Nov 10, 2025 20:32 (IST)

Live Update: स्फोटामुळे दिल्ली मेट्रोच्या काचा फुटल्या

Live Update: लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतर जवळच असलेल्या मेट्रो स्टेशन मधील काचा फुटल्याचं ही समोर आलं आहे. मात्र असं असलं तरी दिल्लीतील मेट्रो सध्या सुरळीत सुरू आहे. 

Nov 10, 2025 20:29 (IST)

Live Updte: संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी झाला स्फोट

दिल्लीत स्फोट: ७ वाजून ५ मिनिटांनी कॉल, 8 ठार

संध्याकाळी ७:०५ वाजता स्फोटाचा कॉल मिळाला.

घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.

तीन ते चार वाहनांना आगीची झळ बसली.

एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली.

दिल्ली पोलिसांनी परिसर सील केला.

फॉरेन्सिक आणि बॉम्बशोधक पथके तपासात गुंतली आहेत.

संपूर्ण दिल्लीत सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला.

Nov 10, 2025 20:28 (IST)

Live Updte : दिल्ली स्फोटानंतर मुंबईत रेड अलर्ट

- दिल्ली येथे घडलेल्या घटनेनंतर मुंबईत देखील पोलिस अलर्टवर

- मुंबई पोलिस यांची माहिती 

- दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट होत अनेक जण मृत झाले आहेत

Nov 10, 2025 20:27 (IST)

LIVE UPDATE: दिल्ली स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक

LIVE UPDATE: दिल्ली स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. शिवाय या स्फोटाची माहिती शहा यांनी घेतली आहे. अमित शाह यांनी सर्व माहिती घेतली आहे. त्यांनी दिल्ली पोलीसांकडून ही माहिती घेतली आहे.