दिल्लीच्या मुख्यंंत्र्यांचं निवासस्थानला (Delhi CM House) टाळं ठोकण्यात आलं आहे. पीडब्ल्यूडी विभागानं ही कारावाई केली आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाचा अवैध वापर केल्याच्या आरोपामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंंत्रीपद सोडल्यानंतर स्वत:चं सरकारी निवासस्थान रिकामं केलं होतं. मुख्यमंत्री निवासस्थानाचा अवैध वापर होत आहे, असा आरोप भाजपाकडून सातत्यानं करण्यात येत होता. त्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 'हँडओव्हर प्रक्रियेचं पालन नीट न केल्यामुळे निवासस्थान सील करण्यात आलं आहे,' असं कारण सांगितलं जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्र्यांचं सामान बाहेर काढलं?
आम आदमी पक्षानं या प्रकरणात उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यावर मोठा आरोप केला आहे. उपराज्यपालांनी मुख्यमंत्री आतिशी यांचं सर्व सामानं बाहेर काढायला लावलं आहे, असा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे.
( नक्की वाचा : मोदींच्या स्वप्नाचा शिल्पकार, हरियाणात केला चमत्कार! मिस्टर डिपेंडेबल होणार भाजपाचा अध्यक्ष? )
दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या प्रकरणात अरविंद केजरावाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांच्या पापाचा घडा भरला आहे. तुमचा भ्रष्टाचारी शीशमहल अखेर सील झाला. या बंगल्यातील शीशमहल सेक्शनचा प्लान संमत करण्यात आला नव्हता. सरकारी प्रमाणपत्र न मिळालेल्या बंगल्यात तुम्ही इथं कसं राहात होता? असा प्रश्न सचदेवा यांनी विचारला आहे.