1 hour ago

Delhi Red Fort Car Blast LIVE Updates: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात आसपासच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर देशात अलर्ट जारी करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरु केला आहे. हा स्फोट आत्मघाती दहशतवादी हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय असून दहशतवादी कृत्ये आणि त्यांच्या शिक्षेशी संबंधित यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Nov 11, 2025 10:33 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: दिल्ली हल्ल्याचे धक्कादायक पुलवामा कनेक्शन समोर

दिल्ली हल्ल्याचं पुलवामा कनेक्शन 

दिल्ली कार स्फोटातील तीन (३) संशयितांना पुलवामा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन-अवंतीपोरा येथे अटक 

काल (१०.११.२०२५) रात्री लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ दिल्ली कार स्फोटाच्या संदर्भात पंपोर पोलिसांनी ०३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

संशयितांची माहिती खाली दिली आहे:

१. तारिक अहमद मलिक (पुत्र गुलाम अहमद मलिक) (एटीएम गुरुद) 

२. आमिर रशीद (पुत्र अब रशीद मीर) (व्हायरल चित्रातील व्यक्ती आणि तारिकचे सिम कार्ड वापरत होता) 

३. उमर रशीद (पुत्र अब रशीद मीर)

तिघेही पुलवामा जिल्ह्यातील आहेत.

तारिक अहमद आणि अमीर रशीद यांना श्रीनगर येथे आणण्यात आले आहे. तथापि, उमर रशीद अजूनही पोलीस स्टेशन पंपोरमध्ये आहे.

Nov 11, 2025 10:14 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात तपासणी

 पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनाला येतात आणि ज्या वेळी दिल्लीसारख्या स्फोटाच्या घटना घडतात त्यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराला मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात येते. BDDS पथकाच्या आझाद नावाच्या कुत्र्याने आधी दगडूशेठ गणपती समोर नतमस्तक  झाला आणि नंतर संपूर्ण मंदिराची पाहणी केली

Nov 11, 2025 10:13 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलविली उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलविली उच्चस्तरीय बैठक 

सकाळी ११ वाजता कर्तव्य भवन येथे सुरक्षा आढावा घेण्यासाठी बोलविली बैठक

अमित शाह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 

केंद्रीय गृह सचिव, आयबी संचालक, दिल्ली पोलिस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक या बैठकीला उपस्थित राहतील. 

जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होतील.

Nov 11, 2025 08:17 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: दिल्ली स्फोटानंतर पुण्यात देखील अलर्ट

दिल्ली स्फोटानंतर पुण्यात देखील अलर्ट 

पुणे रेल्वे स्थानकावर वाढवला पोलीस बंदोबस्त 

पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी 

पुणे पोलीस, आणि रेल्वे पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर चोख सुरक्षा

Advertisement
Nov 11, 2025 07:30 (IST)

Delhi Bomb Blast LIVE Updates: नागपूर विमानतळावर वाहनांची कसून तपासणी

दिल्ली येथील बॉम्ब ब्लास्ट घटनेनंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे..विशेषतः रेल्वे स्थानके आणि विमानतळावर प्रवासी आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात येत आहे..नागपूर विमानतळावर काय स्थिती आहे त्याची माहिती देत आहेत 

Nov 11, 2025 07:30 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: पुलवामाचा उमर मोहम्मद कार चालवत असल्याचं समोर

दिल्ली स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा संशय

UAPA कलम 16,18 अंतर्गत गुन्हा दाखल

उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित

स्फोटाआधीच्या i20 कारचा फोटो समोर

पुलवामाचा उमर मोहम्मद कार चालवत असल्याचं समोर

स्फोटाचा आणि फरिदाबादच्या कारवाईचं कनेक्शन

फरिदाबादमधल्या कटातल्या आरोपींचा सहकारी उमर

संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी

देशभरातल्या विमानतळ, रेल्वे स्टेशन्सवर सुरक्षेत वाढ

राज्यातही अलर्ट जारी, धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली

Advertisement
Nov 11, 2025 07:16 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: लाल किल्ला स्फोटाचीदहशतवादी हल्ला म्हणून चौकशी

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला स्फोट एफआयआरमध्ये बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलम १६ आणि १८ चा वापर केला आहे, ज्यामध्ये दहशतवादी कृत्ये आणि संबंधित शिक्षेचा समावेश आहे. त्यांनी खून आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांसह स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ३ आणि ४ देखील जोडल्या आहेत.

मोठा: लाल किल्ला स्फोटाची आता अधिकृतपणे दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी केली जात आहे.

Nov 11, 2025 07:15 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: दिल्ली बॉम्बस्फोट: देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांवर तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.

विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जात आहे.

दिल्लीत येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी केली जात आहे.

रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

श्वान पथके स्थानकांची तपासणी करत आहेत.

प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

विमान कंपन्यांनी सुरक्षा तपासणीबाबत सूचना जारी केल्या आहेत.

प्रवाशांनी त्यांच्या उड्डाण वेळेच्या किमान तीन तास आधी विमानतळावर यावे.

विमानात चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जात आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत.

Advertisement
Nov 11, 2025 07:14 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: दिल्लीतील स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय

दिल्लीतील स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय 

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, दहशतवादी हल्ल्याचे संकेत 

ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय 

डीएनए चाचणीत उमर होता की नाही हे स्पष्ट होणार 

कारमध्ये आणखी तिघे असल्याचा संशय 

कार थांबलेली असताना तिच्यात स्फोटकं लावण्यात आल्याचा संशय

Nov 11, 2025 07:14 (IST)

Delhi Bomb Blast Live Update: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अपडेट,दहशतवादी कृत्ये अंतर्गत एफआयआर दाखल

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अपडेट

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कृत्ये आणि त्यांच्या शिक्षेशी संबंधित यूएपीएच्या कलम १६ आणि १८ लागू केले आहेत.

स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ३ आणि ४ मध्ये देखील भर घातली आहे.

याव्यतिरिक्त, तपास तीव्र होत असताना एफआयआरमध्ये खून आणि हत्येचा प्रयत्न करण्याचे आरोप समाविष्ट केले आहेत.