Delhi Heat Wave दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन

Delhi Heat Wave : दिल्लीतील वाढत्या उन्हाळ्याचा हरयणा आणि राजस्थानशी देखील संबंध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

Advertisement
Read Time: 2 mins
D
नवी दिल्ली:

राजधानी दिल्लीमध्ये सध्या तापमान चांगलंच वाढलंय. वाढत्या उन्हाळ्यामुळे दिल्लीकर त्रस्त आहेत. एखाद्या भट्टीसारखी दिल्लीची राजधानी सध्या तापलेली आहे. अनेक ठिकाणी 48 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान आहे. वाढत्या उन्हामुळे दिल्लीकरांना बाहेर पडणं अवघड झालंय. अखेर दिल्लीमध्ये उन्हाचा तडाखा का वाढलाय? दिल्लीतील वाढत्या उन्हाळ्याचा हरयणा आणि राजस्थानशी देखील संबंध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हवामान विभागानुसार, दिल्लकरांना आगामी काही दिवस तीव्र उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिलाय. हवामान विभागानुसार राजस्थान आणि हरयणातून कोरडे आणि उष्ण पश्चिमी तसंच उत्तर-पश्चिम वारं वाहतंय. ही हवा दिल्लीमध्ये येत आहे. त्यामुळे दिल्लीच्या तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. त्याचबरोबबर स्वच्छ आभाळ असल्यानं देखील उष्ण वारं वाहत असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. यावर्षी मुंगेशपूरमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 48.3 डिग्री सेल्सियस तापमान होते. रविवारी दिल्लीतील 6 ठिकाणी तापमानाचा पारा 46 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होता.  

( नक्की वाचा : मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा )
 

सध्या दिलासा नाही

हवामान विभागानुसार दिल्लीत 29 मे पर्यंत तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, हरयणा आणि चंदीगड या राज्यात 29 मे पर्यंत उष्णतेचा प्रकोप कायम राहील असा अंदाज आहे. आगामी काही दिवसांमध्ये हवामानात कोणताही दिलासा मिळणार नाही, हे हवामान विभागानं स्पष्ट केलंय. येत्या चार दिवसात दिल्ली, उत्तर प्रदेश,  पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये रात्री देखील उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला IMD नं दिलाय. 

दिल्लीत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी तीव्र उष्णतेची लाट होती. 30 मे पर्यंत 45-46 डिग्री सेल्सियसच्या आसपास तापमान असेल, काही ठिकाणी यापेक्षा 2 ते 3 अंश जास्त तापमान असू शकतं, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अर्थात दिल्लीतील तीव्र उन्हाळ्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. दिल्लीच्या हवामान विभागानुसार वर्षाकील या कालखंडात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. 

Advertisement

( नक्की वाचा : यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर )
 

गेल्या वर्षी नव्हती Heat Wave

दिल्लीकरांना 31 मे पासून उष्णतेपासून दिलसा मिळण्याचा अंदाज आहे. या काळात दिल्लीत ढगाळ वातावरण असू शकतं. त्यामुळे दिल्लीतील सरासरी तापमान 43 अंश से. पर्यंत कमी होऊ शकतं. गेल्या वर्षी दिल्लीकरांना हिट वेव्हचा फटका बसला नव्हता. त्यामुळे लोकांना कदाचित यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र वाटतोय.