GPS उभे आहात की झोपलेले, कसं आहे तुमचं घर? प्रत्येक क्षण होतोय रेकॉर्ड; डिजिटल पाळत थांबवण्यासाठी करा हे उपाय

Digital Arrest Warning: तुम्ही हॉटेलात (Hotel) गेला आहात की हॉस्पिटलमध्ये (Hospital)? रोज कुठे कुठे फिरता, किती लोकांना भेटता आणि तुमचे घर किती मोठे आहे, यासारखी तुमची अत्यंत खासगी माहिती आता सहजपणे इतरांना मिळू शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Digital Arrest Warning: मोबाईल फोनमुळे होऊ शकते डिजिटल अटक
मुंबई:

Digital Arrest Warning: तुम्ही हॉटेलात (Hotel) गेला आहात की हॉस्पिटलमध्ये (Hospital)? रोज कुठे कुठे फिरता, किती लोकांना भेटता आणि तुमचे घर किती मोठे आहे, यासारखी तुमची अत्यंत खासगी माहिती आता सहजपणे इतरांना मिळू शकते. या सर्व माहितीचा गैरवापर करून तुम्हाला 'डिजिटल अटक'ही (Digital Arrest) केली जाऊ शकते. या सगळ्यामागचं कारण आहे तुमच्या स्मार्टफोनमधील (Smartphone) GPS (Global Positioning System) तंत्रज्ञान.

IIT दिल्लीच्या संशोधनात मोठा खुलासा

IIT दिल्लीच्या कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) विभागाने केलेल्या एका मोठ्या आणि व्यापक संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. तुम्ही जेव्हा स्मार्टफोनमध्ये (Smartphone) एखादं ॲप (App) डाउनलोड (Download) करता आणि त्याला तुमचं लोकेशन 'Allow' करता, तेव्हा तुमच्या अँड्रॉइड (Android) फोनमधील सेन्सर्स (Sensors) केवळ लोकेशनच नाही, तर तुमच्या अनेक गोपनीय (Confidential) ॲक्टिव्हिटीजही (Activities) रेकॉर्ड (Record) करायला सुरुवात करतात.

या संशोधनाचे प्रमुख, IIT दिल्लीचे प्रोफेसर डॉ. स्मृती आर. सारंगी (Dr. Smriti R. Sarangi) यांनी सांगितलं की, GPS लोकेशन (Location) तुमच्या हालचाली (Activities) रेकॉर्ड करते, ज्याचा वापर अनेक संस्था चुकीच्या पद्धतीने करू शकतात. या रिसर्चमधून समोर आले आहे की GPS चे अनेक मापदंड (Parameters) तुम्ही कसे उभे (Standing) आहात, कसे झोपलेले (Lying) आहात, कोणत्या परिसरात (Area) आहात, गर्दीच्या (Crowded) ठिकाणी आहात की नाही, तुमचा परिसर किती मोठा आहे (उदा. मोठे घर की छोटे), इतकंच नव्हे, तर नेटवर्कवरील (Network) आर्थिक व्यवहारांसारखी (Financial Transactions) गोपनीय माहितीही ते समजू शकते.

( नक्की वाचा : OMG : कारचा आरसा लागल्याने संताप, पती-पत्नीने 2 किलो मीटर पाठलाग करत तरुणाला चिरडले; पाहा धक्कादायक Video )
 

तुमच्या रोजच्या ठिकाणांची माहिती तुमच्या 'डिजिटल सिग्नेचर'मुळे (Digital Signature) सहजपणे कोणालाही मिळू शकते. IIT दिल्लीने (IIT Delhi) हे संशोधन एका वर्षापेक्षा अधिक काळ आणि अनेक संशोधकांच्या टीमसह अत्यंत व्यापक स्तरावर केले. यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत की GPS मानवी हालचाली (Human Activities) 87% अचूकतेने ओळखू शकते.

Advertisement

GPS इतकी अचूक माहिती कशी काढते?

प्रा. स्मृती रंजन सारंगी (Professor Smriti Ranjan Sarangi) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सामान्यतः GPS ला लोकेशन (Location) जाणून घेण्यासाठी चार सॅटेलाइटची (Satellite) गरज असते. मात्र, अचूकतेसाठी आता 10 ते 12 सॅटेलाइट्सची मदत घेतली जाते. यामध्ये 20-30 मीटरचा फरक असू शकतो. म्हणूनच, आता एक सॅटेलाइट 32 पॅरामीटर्सवर (Parameters) अनेक माहिती पाठवते. ही सर्व माहिती प्रोसेस (Process) करून ॲपला (App) पाठवली जाते.

( नक्की वाचा : Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा; तुमच्या स्टेशनवर सुरु होणार खास सोय, पाहा संपूर्ण यादी )
 

प्रा. सारंगी यांनी पुढे सांगितलं की,  लोकेशनवर सॅटेलाइटचे इलेक्ट्रोमॅग्नेट सिग्नल (Electromagnet Signal) आदळतात आणि या तरंगांमुळे अनेक प्रकारचे मॅपिंग (Mapping) होऊ शकते. यामुळे GPS 80 ते 99% पर्यंत अचूक माहिती देऊ शकते की, तुम्ही मोठ्या घरात (Large House) राहता की छोट्या, तुम्ही रेल्वे स्टेशनवर (Railway Station) आहात की एअरपोर्टवर (Airport). इतकंच नव्हे, तर तुमच्यासोबत किती लोक बसलेले (People with you) आहेत, हे देखील ते सांगू शकते.  तुम्ही फोन सोबत घेऊन चालत असाल, तर ॲप तुमच्या संपूर्ण घराचा ले-आऊट (Layout) देखील सांगू शकते.

Advertisement

डिजिटल अटकेपासून वाचण्यासाठी हे करा उपाय

  • तुमचा खासगी डेटा (Private Data) सुरक्षित ठेवण्यासाठी आणि 'डिजिटल अटक' होण्यापासून वाचण्यासाठी प्रोफेसर सारंगी (Professor Sarangi) यांनी खालील उपाययोजना सांगितल्या आहेत:
  • 'Only Using The App' चा पर्याय निवडा. ॲप वापरत असतानाच लोकेशन (Location) ऑन ठेवा.
  • बॅकग्राउंडमध्ये (Background) कोणतंही ॲप (App) चालू नाहीये, याची खात्री करा. अनेकदा तुम्ही मित्रांशी एखाद्या वस्तूच्या खरेदीबद्दल बोलत असता आणि लगेच तुम्हाला त्याची ॲड (Ad) दिसू लागते. कारण, बॅकग्राउंडमधील ॲपने (App) मायक्रोफोन (Microphone) वापरासाठी 'Allow' केलेले असते.
  • ॲपचा (App) वापर झाल्यावर लगेच लोकेशन (Location) बंद (Off) करा.
  • तुम्ही कोणत्याही संवेदनशील (Sensitive) किंवा गोपनीय ठिकाणी जात असाल, तर मोबाईल (Mobile) बाहेरच ठेवून जाण्याचा विचार करा.
  • मोबाईलमध्ये कमीत कमी ॲप्स ठेवा आणि गरज नसेल तेव्हा ते बंद (Close) करा.

Topics mentioned in this article