Diwali Festival 2025 Domestic Flights expensive Ticket Price: दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाला असून विमान तिकीटाचे दर वाढले आहेत. विशेषतः देशांतर्गत विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले असून, हे दर सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लावत आहेत. विमान कंपन्यांनी प्रवासाच्या मागणीचा फायदा घेत तिकिटांचे दर थेट दुप्पट ते तिपटीने वाढवले आहेत. मलेशिया आणि सिंगापूरपेक्षा आता देशांतर्गत प्रवास करणे महाग झाले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने लोक परदेशी फिरायला जातात. या प्रवासाच्या मागणीमुळे विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केली आहे. मुंबईतून उत्तर प्रदेशातील वाराणसीला जायचे असल्यास जवळपास Rs 30,000 मोजावे लागत आहेत, तर याच दरात परदेशात प्रवास मात्र शक्य आहे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय प्रवासापेक्षा देशांतर्गत विमानसेवा महाग झाले आहेत.
OLA, Uber strike: ॲप आधारित टॅक्सीसेवा गुरुवारी बंद राहणार; काय आहेत चालकांच्या मागण्या?
मुंबई ते वाराणसी तिकीटाचे दर 29,604 आहे तर दिल्ली-हाँगकाँग तिकीटाचे दर 16,282 इतका आहे. मुंबई ते प्रयागराज 20,403 इतके तिकीट आहे तर दिल्ली ते सिंगापूर Rs 17,799 इतके तिकीट आहे. मुंबई ते -कानपूर 20,404 रुपये मोजावे लागणार आहेत. त्या तुलनेने दिल्ली ते मलेशिया विमान प्रवासाणठी 13, 315 इतके रुपये मोजावे लागतील. दिल्ली-वाराणसी 20, 038 इतके तिकीट आहे तर दिल्ली ते दुबई 11, 308 इतकी आहे.
ही आकडेवारी दर्शवते की, मुंबई-वाराणसी किंवा मुंबई-प्रयागराज यांसारख्या प्रमुख मार्गांवर प्रवास करणे, आता आंतरराष्ट्रीय प्रवासापेक्षा जास्त खर्चिक झाले आहे. वाढलेले तिकीट दर आणि त्यातच वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनचे तिकीटही मिळताना येत असलेली अडचण, यामुळे प्रवाशांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. सरकारने या अनियंत्रित दरवाढीवर तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.