Diwali Tatkal Ticket Booking: देशभरात आता सणांना सुरुवात झाली आहे. नवरात्र दिवाळी, दसरा लाखो लोक आपापल्या घरी जातात. अशावेळी ट्रेनच्या तिकिटाची सर्वात मोठी समस्या समोर येते. अनेक प्रवासी दोन ते तीन महिने आधीच तिकीट बुक करतात, पण काही लोक असे आहेत, जे कामाच्या घाईत तिकीट बुक करायला विसरतात. अशा वेळी तत्काळ सुविधा उपयोगी ठरते. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला तत्काळ बुकिंगशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हे सण आपल्या कुटुंबासोबत एकत्र साजरे करू शकाल.
तत्काळ बुकिंग म्हणजे काय?
रेल्वेने तत्काळ तिकिटाची सुविधा अशा लोकांसाठी सुरु केली आहे, ज्यांना अचानक प्रवासाची गरज असते किंवा ज्यांना जनरल बुकिंगमधून तिकीट मिळत नाही. या सुविधेमुळे प्रवासाच्या अगदी एक दिवस आधी तिकीट बुक करता येते. रेल्वे तत्काळ बुकिंगसाठी काही जागा राखीव ठेवते.
तत्काळ तिकीट कधी बुक करावे?
एसी क्लाससाठी तत्काळ तिकिटाची बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजता सुरू होते आणि नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 वाजता सुरू होते.
( नक्की वाचा : Beed News: प्रतीक्षा संपली! 40 रुपयांत बीडहून अहिल्यानगरला रेल्वेने जा; किती स्टेशन असणार? वाचा सर्व माहिती )
तत्काळ तिकीट कुठे बुक करावे?
तुम्ही स्वतः तत्काळ तिकीट बुक करू इच्छित असाल, तर त्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपचा वापर करू शकता. तत्काळ तिकीट रेल्वे स्टेशनच्या काउंटरवरूनही बुक करता येते, पण काउंटर बुकिंगपेक्षा ऑनलाइन तिकिटांची संख्या जास्त असते.
तत्काळ तिकीट कसे बुक करावे?
- तुम्हाला तत्काळ तिकीट बुक करायचे असेल, तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे IRCTC अकाउंट तयार करावे लागेल.
- अकाउंटमध्ये लॉग-इन केल्यानंतर "Booking" टॅब आणि "Tatkal" लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्हाला ट्रेन नंबर, बोर्डिंग स्टेशन, डेस्टिनेशन, प्रवासाची तारीख यासारख्या सर्व माहिती भरायची आहे.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर "Search" वर क्लिक करा.
- सर्च केल्यानंतर उपलब्ध तत्काळ तिकिटे दिसतील.
- क्लास निवडल्यानंतर सर्व प्रवाशांची माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर पेमेंट लिंकवर क्लिक करा.
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगच्या मदतीने पेमेंट करू शकता.
( नक्की वाचा : Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग )
या सोप्या टिप्सने बुक होईल तत्काळ तिकीट
अनेक हजारो लोक तत्काळ तिकीट बुक करतात, पण रेल्वेकडे एवढी तिकिटे नसतात. म्हणून 1 मिनिटापेक्षा कमी वेळात तत्काळ तिकिटे भरली जातात. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे तिकीट तत्काळमध्ये बुक करू शकाल.
- बुकिंग विंडो उघडण्याआधीच लॉग-इन करा.
- तिकीट बुक करण्याआधी तुमची माहिती मास्टर पॅसेंजर लिस्टमध्ये तयार ठेवा, यामुळे वेळ वाचेल.
- चांगल्या इंटरनेट कनेक्शनचा वापर करा.
- जलद पेमेंटसाठी UPI ॲपचा वापर करा, गरज नसेल तर कार्डचा वापर टाळा.