सक्तवसुली संचालनालय (ED) च्या मुख्य कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या विरुद्ध करण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित तब्बल 11.14 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. बेकायदेशीर सट्टेबाजी प्लॅटफॉर्म 1xBet च्या जाहिरातींना समर्थन दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई PMLA, 2002 (Prevention of Money Laundering Act) कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. रैना आणि धवन यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेचा तपशील ही समोर आला आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. माजी क्रिकेट पटू सुरेश रैना यांच्या नावावर असलेले Rs. 6.64 Crore किंमतीचे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जप्त करण्यात आली आहे. ही जप्ती तात्पूरत्या स्वरूपाची आहे. तर शिखर धवन यांच्या नावावर असलेली Rs. 4.5 Crore किमतीची स्थावर मालमत्ता (Immovable Property) ही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई तात्पूरत्या स्वरूपाची असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे.
नक्की वाचा - टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट, देणार 'ही' महागडी कार गिफ्ट
1xBet या अवैध सट्टेबाजी प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोघांवर मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अशा बेकायदेशीर प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातीमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीजविरोधात तपास यंत्रणा कठोर पाऊले उचलत असल्याचे यातून स्पष्ट होते. एकूण Rs. 11.14 Crore किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे ही कारवाई रैना आणि धवनसाठी मोठा धक्का मानली जात आहे. त्यातून आता सुखरूप कसे बाहेर पडायचे याचा विचार या दोघांना करावा लागणार आहे.