पश्चिम बंगाल: विविध राज्यांमधील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्येही इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये 18 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीने शाळेत पहिला तर जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला. मात्र तिने मिळवलेले यश ती पाहू शकली नाही. थैबी मुखर्जी असे या मुलीचे नाव आहे. तिचा निकाल लागल्यानंतर तिच्या पालकांना अश्रु अनावर झाले तसेच कुटुंबियांसह शाळेतील शिक्षक अन् संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थैबी मुखर्जी ही दहावीची विद्यार्थी होती. तिने कठोर परिश्रम आणि मेहनत घेऊन परीक्षा दिली आणि तिच्या शाळेत पहिला क्रमांक पटकावला. इतकेच नव्हेतर जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला. जेव्हा तिचा निकाल आला तेव्हा फक्त घरातीलच नव्हेतर तिच्या शाळेतील शिक्षकांचेही डोळे पाणावले. थैबी खूप हुशार होती. तिने अभ्यास करुन अत्यंत मेहनतीने परीक्षा दिली मात्र तिने मिळवलेले यश ती पाहू शकली नाही.
परीक्षेपूर्वी थैबीची तब्येत बिघडली आणि ती तिची प्रकृती खालावत चालली होती. जेव्हा चाचण्या केल्या गेल्या तेव्हा असे आढळून आले की तिला कावीळ झाली आहे. ती औषध घेत होती. आजारी असतानाही तिने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. गोळ्या औषधे घेऊन ती परीक्षेस बसली. पेपर संपल्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केले होते. मात्र दुर्दैवाने निकालाच्या 17 दिवस आधी तिचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)
आजारी असूनही थैबीने परीक्षेत इतके चांगले पेपर लिहले की तिला प्रत्येक विषयात 95 पेक्षा जास्त गुण मिळाले. तिने बंगालीमध्ये 99, भौतिकशास्त्रात 97, जीवशास्त्रात 98 आणि इतिहास आणि भूगोलात 95 गुण मिळवले. थैबीच्या मख्याध्यापकांनी सांगितले की थैबी खूप हुशार होती तिला चार वेळा शिष्यवृत्तीही मिळाली होती. सगळे म्हणायचे की थाबीला चांगले गुण मिळतील. मात्र नियतीने घात केला.
(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)