माजी अॅडल्ट स्टार मिया खलिफा हिचा फोटो तमिळनाडूतील एका उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या होर्डींगवर झळकल्याने होर्डींग पाहणारे अवाक झालेत. तमिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यामध्ये हे होर्डींग लावण्यात आले आहे. आदी पेरुक्कू उत्सवानिमित्त हे होर्डींग लावण्यात आले आहे. सोज्वळ रुपात, डोक्यावर दुधाचा हंडा घेतलेली मिया खलिफा होर्डींगवर दिसत असून तिचा फोटो इथे का वापरण्यात आला असावा असा प्रश्न होर्डींग पाहणाऱ्याला पडतो आहे.
पार्वतीचा अवतार समजल्या जाणाऱ्या अम्मन देवीचा उत्सव म्हणून तमिळनाडूतील मंदिरांमध्ये आदी पेरुक्कू उत्सव साजरा केला जातो. तमिळनाडूतील कुरुविमलाईमध्ये, नागथम्मन आणि सेल्ल्याम्मन मंदिरे उत्सवाच्या निमित्ताने सजवली जातात. या उत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी होर्डीग उभारली जातात.
उत्सवासाठी लावण्यात आलेल्या बऱ्याच होर्डींगपैकी एका होर्डींगवर बहुतेक लोकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या, कारण या फोटोमधला एक चेहरा त्यांना त्यांच्या फार ओळखीचा वाटत होता. बारकाईने पाहिल्यानंतर हा चेहरा मिया खलिफाचा असल्याचं होर्डींग पाहणाऱ्यांना कळत होतं. त्यामुळे हे होर्डींग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
या होर्डींगवर स्थानिक कार्यकर्त्यांचे आधार कार्डावर असतात तसे फोटो झळकले आहेत. हे होर्डींग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांनीही या होर्डींगची दखल घेतली आहे. प्रशासनाच्या कानावर या होर्डींगची बाब जाताच त्यांनी हे होर्डींग काढले आहे. स्थानिक प्रशासनही या होर्डींगवर मिया खलिफाचा फोटो का लावण्यात आला आहे याबाबत अनभिज्ञ आहे. हे कोणी मुद्दान केलंय का अजाणतेपणी झालंय याबाबतही माहिती मिळू शकलेली नाहीये.