Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला, जमावानं फेकली पगडी, जोरदार घोषणाबाजी, Video

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य देणं शेतकरी नेते राकेश टिकैत यांना चांगलंच भोवलं आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये टिकैत यांना नागरिकांचा जबरदस्त विरोध सहन करावा लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य देणं शेतकरी नेते राकेश टिकैत यांना चांगलंच भोवलं आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये टिकैत यांना नागरिकांचा जबरदस्त विरोध सहन करावा लागला. जन आक्रोश मोर्च्यात संतप्त जमावानं टिकैत यांना धक्काबुक्की केली. त्यामध्ये त्यांची पगडी खाली पडली. पोलिसांनी कसं-बसं त्यांना गर्दीतून बाहेर काढलं. यावेळी नागरिकांनी टिकैत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले होते टिकैत ?

राकेश टिकैत यांनी पहलगाम हल्ल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या हल्ल्याचा कुणाला फायदा होणार आहे? हिंदू-मुस्लीम कोण करत आहे? हा हल्ला घडवणारा चोर पाकिस्तानमध्ये नाही, तर इथंच आहे, असं वक्तव्य टिकैत यांनी केलं होतं.

टिकैत इतक्यावरच थांबले नाहीत. तर ते हे समजावून सांगताना पुढं म्हणाले की, गावात कुणाचा खून झाला की, जमीन मिळवण्यासारखे फायदे मिळवून देणाऱ्याला पोलिस सर्वात आधी पकडतात. ही घटना घडलेल्या व्यक्तीचा शोध कुठे घेणार? चोर तुमच्यात आहे, पाकिस्तानात नाही.या घटनेचा फायदा कुणाला झाला? काश्मीरमधील नागरिक या प्रकारची घटना तिथं घडल्यावर स्थिर होऊ शकत नाहीत. 

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )
 

जनआक्रोश मोर्च्यात घटना

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात मुजफ्फरनगरमध्ये शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. स्थानिकांसह हिंदू संघटनेचे कार्यकर्ते देखील या मोर्च्यात सहभागी झाले होते. 

डोक्यात मारली काठी

या मोर्च्यात टिकैत यांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला. त्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये हा विरोध सुरु असताना कुणीतरी टिकैत यांच्या डोक्यात काठी मारली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील फेटा खाली पडला. 

Advertisement

चोर पाकिस्तानात नाही...

या हल्ल्यानंतर टिकैत यांनी चोर पाकिस्तानात नाही, हे वक्तव्य पुन्हा एकदा केले. या हल्ल्याचा फायदा कुणाला होणार आहे? चोर पाकिस्तानध्ये आहे. हा शेतकरी आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्म आहे, असा आरोप त्यांनी केला.