बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुख: व्यक्त केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पाटणा:

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुख: व्यक्त केले आहे. तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांनीही शोक व्यक्त केला आहे. बिहारच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून त्यांची ओळख होती. भाजपचे संकटमोचक म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जात होते. सुशीलकुमार मोदी गेल्या सहा महिन्यापासून कॅसर सारख्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुशीलकुमार मोदी हे राज्यसभेवर होते. मात्र  नुकताच त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी डॉ. भीम सिंह आणि डॉ. धर्मशिला गुप्ता यांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंद केले होते. शिवाय देशात गेल्या 33 वर्षात पक्षाने आपल्याला विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा या चारही ठिकाणी प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. या पुढेही आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले होते. 

हेही वाचा - घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांचा मृत्यूला कोण जबाबदार?

सुशीलकुमार मोदी आणि नितीश कुमार यांची जोडी अनेक वर्ष बिहारच्या सत्तेत होते. नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. ज्यावेळी नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली त्यावेळी बोललं जात होतं की जर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री असते तर ही वेळ आली नसती. या जोडीने अनेक वर्ष लालू यादव यांनी विरोधीपक्षात बसण्यास भाग पाडलं होतं. 

सुशीलकुमार मोदी हे गेल्या तीस वर्षापासून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांनी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. बिहारच्या मोजक्याच नेत्यांनी चारही सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्या पैकी सुशीलकुमार मोदी एक आहेत. त्यांनी 2005 ते 2013 आणि 2017 ते 2020 या कालावधीत बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. 

Advertisement

सुशीलकुमार मोदी यांच्या निधनानंतर पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दुख: व्यक्त केले आहे. सुशीलकुमार मोदी यांच्या रूपाने आपण आपला जुना सहकारी गमावला आहे असे पंतप्रधान म्हणाले. बिहारमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात सुशीलकुमार मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. त्यांनी बिहारच्या राजकारणात आपली एक वेगळी छाप पाडली होती असंही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, रवीशंकर, जे. पी. नड्डा आणि तेजस्वी यादव यांनी दुख: व्यक्त केले आहे. 

Advertisement