'राहुल गांधींशी वाद घालण्याची इच्छा नाही', 'त्या' आरोपांना माजी CJI चंद्रचूड यांचं उत्तर

DY Chandrachud Interview : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud ) यांनी उत्तर दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

DY Chandrachud Interview : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud ) यांनी उत्तर दिलं आहे.  न्यायपालिकेचे जबाबदारी ही कायद्याचा अर्थ लावणे आहे. विरोधी पक्षाचं काम न्यायपालिका करेल, अशी समजूत लोकांनी करु नये,' असं उत्तर चंद्रचूड यांनी दिलं आहे. ANI या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राजकीय विरोधकांना लोकशाहीत स्वतंत्र स्थान आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यावर मला वाद घालायचा नाही, कारण ते माझं परिक्षेत्र नाही. पण, या मंडळींनी न्यायव्यवस्था ही विधीमंडळातील आणि संसदेतील विरोधकांची भूमिका बजावेल ही अपेक्षा करु नये. आम्ही कायदेमंडळातील विरोधकांची भूमिका पार पाडावी अशी या मंडळींची अनेकदा अपेक्षा असते, पण तसं होऊ शकत नाही. कायद्याचा अर्थ लावणे हे आमचं काम आहे, असं माजी सरन्यायाधीशांनी या विषयावर बोलताना सांगितलं.

 'आमच्यावर कार्यपालिकेचं काम हे कायदा आणि राज्यघटनेनुसार आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांसाठी वेगळी जागा आहे. पण, लोकं न्यायपालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायची आहे. न्यायालय आणि राजकीय विरोधक यांची जागा बदलण्याची त्यांची इच्छा आहे,' असं चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं. 

काय म्हणाले होते राहुल?

चंद्रचूड यांच्या या स्पष्टीकरणाला राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ आहे. 'मीडिया, तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्था या तीन्ही विभागाची कामं आम्ही करत आहोत. हे या देशाचं वास्तव आहे,' असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

( नक्की वाचा : Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार )

चंद्रचूड यांना त्यांनी पंतप्रधान आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या भेटीबाबत सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी एक माणूस म्हणून अधिकृत बैठकांमध्ये सहभागी होणं ही सामन्य बाब आहे,' असं ते म्हणाले. काही पदांवरील नियुक्तीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते तसंच मुख्य न्यायाधीश यांचा निवड समितीमध्ये समावेश आवश्यक आहे. आम्ही या विषयावर चर्चा करुन निष्कर्ष काढू शकतो. हा निष्कर्ष काढण्यासाठी एक व्यक्ती म्हणून 10 मिनिट एकत्र चहापान करण्यासाठी घालवता. त्यावेळी क्रिकेट, सिनेमा या सारख्या अन्य गोष्टींवरही चर्चा करत असता, असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

चंद्रचूड यांनी गणेशोत्सवाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरातील पुजेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्या वादावर माजी सरन्यायाधीश म्हणाले, 'ही काही असमान्य घटना नाही. ही एक सामाजिक भेट होती. पंतप्रधान आणि न्यायाधीश वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात एकत्र असतात. पण आम्ही आमचं काम करण्यास स्वतंत्र आहोत, हे मी अनेकदा यापूर्वी सांगितलं आहे.'