आधी NSG कमांडो, राजकारणात एन्ट्री मारताच देशभर ड्रग्जचं रॅकेट पसरवलं अन् ..26/11 चा हिरो कसा बनला व्हिलन?

Former NSG Commando Arrested Inside Story : राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणि अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत गांजा तस्करांचा पर्दाफाश केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Former NSG Commando Arrested
मुंबई:

Former NSG Commando Arrested Inside Story : राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणि अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत गांजा तस्करांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या रॅकेट प्रकरणी आरोपी सरगना बजरंग सिंहला अटक केली. पोलिसांच्या तपासात समोर आलं की,बजरंग सिंह गांजा तस्कर बनण्याआधी नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स (NSG) चे कमांडो होते. त्यांनी मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पण आता बजरंग गांजा तस्कर बनला आहे. पोलिसांनी बजरंगला अटक केल्यानंतर अनेक खुलासे केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग सिंहची गँग ओडिशा, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त सक्रीय आहे. ड्रग्जच्या धंद्यात बजरंग सिंह एक मोठं नाव आहे. त्यामुळेच दिर्घकाळापासून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी बजरंगवर 25 हजार रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. राजस्थानच्या एटीएसने बजरंगकडून 200 किलो गांजा जप्त केला आहे.

बजरंग सिंहने दहावीनंतर शिक्षण सोडलं होतं. पण त्यांच्या जबरदस्त फिटनेसमुळे त्यांना बीएसएफमध्ये करिअर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी बीएसएफ अधिकारी म्हणून पंजाब, आसाम, राजस्थान, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील घुसखोरांवर कारवाई केली. काही वर्ष बीएसएफमध्ये सेवा केल्यानंतर बजरंग ची एनएसजी कमांडे म्हणून निवड झाली.

नक्की वाचा >> Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बजरंगने दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, 2021 मध्ये बजरंग सिंह राजकारणाच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट झालं. तो राजस्थानच्या त्याच्या गावी परतला आणि एका राजकीय पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता बनला. त्याने त्याच्या पत्नीलाही गावातील निवडणुकीत उभं केलं होतं.

Advertisement

राजकारण आणि गुन्ह्यांच्या दुनियेत एन्ट्री 

आपल्या गावात राजकारणी म्हणून काम करणारा बजरंग सिंह एनएसजी कमांडे म्हणून देशसेवा करत होता. पण त्याने चुकीचा मार्ग स्वीकारून तो मोठा तस्कर बनला.राजकारणात असतानाही त्याने गुन्हेगारांसोबत संपर्क वाढवला. अशाचा एका तस्कराने त्याला गांजाच्या धंद्यात उतरवलं. त्याने ओडिशा आणि तेलंगणापर्यंत त्याचं रॅकेट वाढवलं. 

नक्की वाचा >> 'हा नियम कोणी बनवला?', शॉर्ट्स घातलेल्या महिलेला मंदिरात प्रवेश नाकारला, नंतर झाला मोठा राडा, Video व्हायरल

पोलिसांच्या तपासात बजरंगने सांगितलं की, तो छोट्या-छोट्या तस्करी करत नव्हता. त्याने खूप गंभीर प्रकरणांत सहभाग घेतला होता. राज्याच्या सीमेवर गांजा पोहोचवण्याचं काम तो करत होता.मागील काही वर्षात त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. 2023 मध्ये त्याला गांजा तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Advertisement