Former Union Minister Girija Vyas : माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास (वय 78) या घरात पुजा करीत असताना लागलेल्या आगीच तब्बल 90 टक्के होरपळल्या आहेत. त्यांना गुजरातमधील अहमदाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवर कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्यालाही मार लागला आहे. ज्यामुळे ब्रेन हॅमरेजसारखी परिस्थिती उद्भवली आहे. त्यांना सध्या व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं असून प्रकृतीमध्ये सुधारणा दिसताच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वरिष्ठ काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास 31 मार्चच्या सोमवारी राजस्थानच्या उदयपूरमध्ये आपल्या घरात आरती करीत होता. त्यावेळी खाली ठेवलेला दिव्याला त्यांच्या दुप्पट्याचा स्पर्श झाला आणि त्या जळाल्या. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र तोपर्यंत त्या 90 टक्के होरपळल्या होत्या.
नक्की वाचा - Crime news: माजी गृह मंत्र्याच्या मुलीचं टोकाचं पाऊल, दुसऱ्या मजल्यावरून...
गिरीजा व्यास या काँग्रेसच्या एक प्रमुख नेत्या आहेत. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिल्या आहेत. त्या राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी काही काळ राष्ट्रीय महिला आयोगाच्याही अध्यक्षपदावरही काम केलं आहे. त्यांच्यासोबत झालेल्या दुर्घटनेनंतर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार यावा यासाठी नागरिकांकडून प्रार्थना केली जात आहे.