Garba Girl Viral Video : सामाजिक जीवन जगताना लोकांशी कसं वागावं, याचं उत्तम उदाहरण एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यांना पाहिल्यावर अनेकांना धक्काच बसतो. भररस्त्यात स्टंटबाजी करून प्रवाशांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न काही तरुणांकडून केला जातो. लोकल ट्रेनमध्येही विंडो सीटवरून प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय. पण नुकताच एक असा व्हिडीओ समोर आला आहे,जो पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है..खरंतर घडलं असं की, एक तरुणी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर एकटीच उभी होती. त्यानंतर तिच्यासोबत एका रॅपिडो रायडरने असं काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गरबा खेळून घरी परतणाऱ्या या तरुणीसोबत त्या रात्री नेमकं घडलं तरी काय? जाणून घेऊयात.
तरुणीचा व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
रात्री गरबा खेळून एक तरुणी रस्त्यावर एकटीच उभी होती. पण तिच्याजवळ तिच्या फ्लॅटची चावी नसते. अशा परिस्थितीत रॅपिडो रायडर तिला एकटीला सोडून निघून जात नाही. तर रॅपिडो चालवणारा तो व्यक्ती तिच्यासोबत थांबतो. तो त्या तरुणीला मदत करतो, ज्यामुळे तिला खूप आनंद होतो. तिला आलेला अनुभव ती कॅमेरात कैद करते आणि व्हिडीओ त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक करते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यूजर्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नक्की वाचा >> NDTV Exclusive : सूर्याला कोणी बनवलं नंबर 1 कॅप्टन? मुलाखतीत सूर्यकुमारने सगळंच सांगितलं, "तो एकमेव खेळाडू.."
व्हिडीओ शेअर करत तरुणी म्हणते, मी रात्री गरबा खेळून आली आहे आणि माझ्याकडे आता फ्लॅटची चावी नाहीए. तुम्ही पाहू शकता की,सगळीकडे खूप शांतता आहे. मध्यरात्रीची वेळ आहे आणि मी फक्त वाट पाहत होती. पण रॅपिडोच्या भाऊने म्हटलं की, मॅडम जोपर्यंत तुमचा फ्रेंड येत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत थांबतो. त्याने असं म्हटल्यावर मला खूप बरं वाटलं. कारण आजही माणुसकी जिवंत आहे.
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
या 22 सेकंदाच्या व्हिडीओत तरुणीने रॅपिडो रायडरचं खूप कौतुक केलं. तसच व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सनेही त्या व्यक्तीवर स्तुतीसुमने उधळली. @333maheshwarii नावाच्या X यूजरने हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय,तुमच्यामुळे त्या तरुणीला रस्त्यावर एकट असल्यासारखं जाणवलं नाही. तसच हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि रेडिटवरी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्यूज मिळाले असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईकही केला आहे.