Gautam Gambhir Received Threat From ISIS : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना 'आयसीस काश्मीर' (ISIS Kashmir) या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर गंभीरने बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाईची मागणी केली.
गौतम गंभीरने पोलिसांना आपल्या कुटुंबीयांची आणि जवळच्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून गंभीर आणि त्याच्या कुटुबीयांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य पावले उचलणार आहेत.