सध्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. कुटुंब पर्यटनाच्या निमित्तानं फिरण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र हे करत असताना काही नको त्या गोष्टीही होत आहेत. अशीच एक दुर्घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये राहाणाऱ्या बलदानीया कुटंब पोईचा इथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी हे संपुर्ण कुटुंब पोहण्यासाठी नर्मदा नदीत उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने एका मागून एक असे आठ जण पाण्यात बुडाले. जेव्हा आरडा ओरडा करण्यात आला त्यावेळी तिथे असलेल्या स्थानिकांनी पाण्यात उड्या मारल्या. आठ जणां पैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र कुटुंबातील सात सदस्य अजूनही सापडले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बलदानीया कुटुंब हे मुळचे गुजरातच्या अमरेलीचे राहाणारे आहे. व्यापारा निमित्त ते सुरत येथे स्थायिक झाले आहेत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे. त्यामुळे कुटुंबा समवेत ते फिरण्यासाठी बाहेर निघाले होते. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील पोईचा इथं ते फिरण्यासाठी आले होते. यावेळी दुपारच्या वेळी त्यांनी नर्मदा नदीत पोहण्याचा निर्णय घेतला. नदीत कुटुंबातील एक एक सदस्य उतरले. विशेष म्हणजे त्यात तीन लहान मुलांचाही समावेश होता. मात्र पाण्याचा अंदाज या पैकी एकालाही आला नाही. ते पाण्यात बुडू लागले. काठावर असलेल्या लोकांना आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी तिथे असलेल्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्यात एकाला वाचवण्यात यश आले. मात्र बाकीचे सात जण अजूनही सापडले नाही.
हेही वाचा - पतीचा मृत्यू, पत्नीचा देहदानाचा संकल्प, 'तीनं' हा निर्णय का घेतला?
या दर्घटनेनंतर राजपिपला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शिवाय पोलिसही घटनास्थळी पोहोचले. बुडालेल्या 7 जणांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे बलदानीया कुटुंबावर शोककळा परसरली आहे. फिरण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर काळानेच घाला घातला आहे.