गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज अहमदाबाद येथील अदाणी विद्या मंदिर (AVM) च्या विद्यार्थ्यांना कष्ट, शिस्त आणि व्यसनांपासून दूर राहणे हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे सांगितलं आहे. कष्ट आणि इमानदारीने यशाचं शिखर गाठा असं ही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं. अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी आणि विश्वस्त शिलिन अदाणी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. आपल्या भाषणात राज्यपालांनी तरुणांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. "जी मुले लहानपणापासून कष्ट करतात, व्यसनांपासून दूर राहतात आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतात, त्यांना जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. अशा मुलांसाठी नेहमीच नव नवीन दालनं उघडतात," असे ते म्हणाले.
जीवनात संघर्षमय पार्श्वभूमी हा अडथळा नसतो, असे सांगून त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या महान नेत्यांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख केला. या महान व्यक्तींनी अडचणींवर मात करत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्यपालांनी विद्यार्थ्यांना साधेपणाने आणि जबाबदारीने जगण्याचा आग्रह केला. सकस आहार घेणे, प्रामाणिक राहणे आणि शंका, लाज किंवा भीती आणणारे कोणतेही पर्याय टाळण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
'एव्हीएम'च्या विद्यार्थ्यांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' मिळाल्यावर राज्यपाल भारावले होते. त्यांनी तरुण विद्यार्थ्यांना सांगितले की, "जेव्हा मुले लहानपणापासून खूप मेहनत घेतात, वाईट व्यसनांपासून दूर राहतात आणि पुढे जायचे ठरवतात, तेव्हा त्यांना कोणीही रोखू शकत नाही" संघर्षमय परिस्थितीतून येणे हा अडथळा नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, प्रामाणिक पणाच्या आधारावर यशाची शिखरे सर करावी. अशा विद्यार्थ्यांना कोणता ही अडथळा कधी ही येत नाही. ती नक्कीच पुढे जातात हे सांगायला ते विसरले नाहीत.
मूल्यांवर आधारित विनामूल्य शिक्षण देणाऱ्या AVM च्या या अनोख्या मॉडेलचे आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. अदाणी फाऊंडेशन गरीब मुलांना IITs, IIMs आणि AIIMS सारख्या भारतातील सर्वोच्च संस्थांमध्ये पोहोचण्यास मदत करत आहे. असे त्यांनी सांगितले. AVM च्या 'चेंजमेकर सिरीज'चा भाग म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2008 मध्ये स्थापित AVM, पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना शिक्षण, पुस्तके, गणवेश, जेवण आणि वाहतूक सुविधांसह सर्वांगीण शिक्षण मोफत पुरवते. 22 राज्यांतील 7,071 गावांमध्ये काम करणाऱ्या अदाणी फाऊंडेशनने 9.6 मिलियन लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे.