Independence Day 2025 Wishes: हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे! स्वातंत्र्यदिनाच्या पाठवा शुभेच्छा

Independence Day 2025 Wishes In Marathi: तुम्हाला तुमचा मित्रपरिवार, नातेवाईकांना 15 ऑगस्ट रोजी शुभेच्छा पाठवायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Independence Day 2025 Wishes In Marathi: 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2025)  1947 साली याच दिवशी भारत ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशवासीयांनी आठवडाभरापूर्वीपासूनच स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण करणे हे प्रत्यक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य लाभल्यापासून आजपर्यंत आपल्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी तीनही सैन्यदले, भारताची अखंडता शाबूत राहावी यासाठी देशासाठी शहीद होणारे सैनिक यांचेही स्मरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.  शाळा, महाविद्यालये, सोसायटी, सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये अत्यंत उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. (Happy Independence Day 2024 Wishes)  साजरा केला जातो. यावेळी देशभक्तीपर गीतांचेही सादरीकरण केले जाते. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Happy Independence Day 2024 Messages) देतात आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित करत असतात. तुम्हाला देखील मित्रपरिवार, नातेवाईकांना 15 ऑगस्ट शुभेच्छा पाठवायचे असतील खालील शुभेच्छा संदेश नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. तसेच हे संदेश (Happy Independence Day 2024 Images) तुम्ही आपल्या Whatsapp Status, Facebook Post आणि Instagram स्टेटसमध्येही ठेवू शकता. 

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 79th Independence Day 2025 Wishes In Marathi

1.प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे , सन्मान देशाचा वाढत जावो, 
सण स्वातंत्र्याचा चिरायू होवो! उत्सव स्वातंत्र्याचा 
सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा
Happy Independence Day 2025

Advertisement

2.अखंड राहो विविधतेतील एकता; 
अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा! 
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयंना हार्दिक शुभेच्छा
Happy Independence Day 2025

3.कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारे प्रेम म्हणजे देश प्रेम, 
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence Day 2025

4.आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा 
भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा
घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा
साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा
सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence Day 2025

Advertisement

5.उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांना, ज्यांनी भारत देश घडविला.
Happy Independence Day 2025

6.शक्ती, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे तिरंगा
केवळ ध्वज नाही तर भारतीयांची ओळख आहे तिरंगा
एकता ही भारताची आहे शक्ती
ही ओळख जपणेहीच खरी देशभक्ती
Happy Independence Day 2025

Advertisement

7.विविधतेत एकता आहे आमची शान
म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान
जय हिंद...जय भारत 
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence Day 2025

8.सलाम आहे त्या वीरांना 
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला.
Happy Independence Day 2025

9.ज्यांच्या बलिदानामुळे लाभले स्वातंत्र्य त्यांचे स्मरण करूया,
विश्वास शोभूनी राहो भारत राष्ट्र यासाठी शपथ घेऊया.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence Day 2025

10.नको जातीचा भेद, नको धर्माचा द्वेष,
एकजुटीने बांधूया, नवा आणि समृद्ध देश.
स्वातंत्र्याच्या या दिवसाचे, करूया आज स्मरण,
हे स्वातंत्र्य जपण्यासाठी, घेऊया नवी शपथ, नवा प्रण.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
 

स्वातंत्र्यदिनानिमित्त शेअर करा हे फोटो Happy Independence Day 2025 Photos

Photo Credit: PTI

Photo Credit: Envato

Photo Credit: Envato

Photo Credit: Envato