उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथे मोठी दुर्घटना घडली आहे. एका सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. हाथरस जवळील फुलरी गावात भोले बाबांच्या सत्संगचे आयोजन केले होते. या सत्संग मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेनंतर हे भोले बाबा कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहे संत भोले बाबा?
संत भोले बाब हे मुळचे काशीरामनगरच्या पटियाली गावाचे रहीवाशी आहेत. पहीले ते उत्तर प्रदेश पोलिसात होते. जवळपास 18 वर्षे त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. ते त्यांच्या गावात एका झोपडीत राहातात. ते उत्तर प्रदेशासह इतर राज्यात जावून प्रवचन देत असतात. लहान पणी ते वडीलां बरोबर शेती करत होते. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसात काम केले. त्यांनी जवळपास एक डझन पोलिस ठाण्यात काम केले आहे. शिवाय इंटेलिजेंस युनिटमध्येही त्यांनी काम केले आहे.
'माझं कोणी गुरू नाही'
संत भोले बाबा यांनी सांगितलं आहे की त्यांचे कोणी गुरू नाहीत. त्यांना देवाबाबत अस्था आहे. त्याचा आपला साक्षात्कार झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आपण लोक कल्याणाचे काम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. संत भोलेबाबा यांचे लाखो अनुयायी उत्तर प्रदेश आणि अजूबाजूच्या राज्यात आहेत.
कोरोना काळातही सत्संग
याच भोले बाबांनी कोरोना काळातही एक सत्संग आयोजित केले होते. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद मध्ये हेसत्संग 2022 मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने सत्संगासाठी 50 लोकांनाच परवानगी दिली होती. पण जेव्हा हे सत्संग सुरू झाले त्यावेळी त्यात 50,000 हजार जणांनी हजेरी लावली होती. त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्थाच बिघडली होती. त्यावेळी त्यांच्या सत्संगची मोठी चर्चा झाली होती.
चेंगराचेंगरी कशी झाली?
भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन हाथरसमध्ये केले होते. हाथरस जवळ असलेल्या फुलरई गावात हे सत्संग झाले. त्याला मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 87 जणांना जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वात जास्त जण हे महिला आणि लहान मुले आहेत. या चंगराचेंगरीत जवळपास 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर प्रशासन हादरले आहे. अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या सत्संगामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. या सत्संगमध्ये किती जण सहभागी होतील याची माहिती आयोजकांनी प्रशासनाला दिली नव्हती. जेवढे भावीक उपस्थित राहाणार होते त्यापेक्षा किती तरी अधिक जण या सत्संगमध्ये सहभागी झाले होते.