Hathras Stampede, Bhole Baba Secert : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. इथं नारायण साकार उर्फ भोले बाबाचा सत्संग होत होता. भोले बाबाचे उत्तर प्रदेशात हजारो भक्त आहे. उत्तर प्रदेशासह दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशातही भोले बाबाचा भक्त संप्रदाय आहे. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार भोले बाबाच्या आश्रमात अनेक रहस्य दडली आहेत. भोले बाबा नेहमा पांढऱ्या सूटमध्ये दिसतात. त्याचबरोबर त्याच्या खोलीत फक्त मुलींना एन्ट्री होती, अशी माहितीही मिळत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलीस कॉन्स्टेबल ते स्वयंभू बाबा प्रवास
नारायण साकारनं एका सामान्य व्यक्ती ते स्वयंभू बाबा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत पूर्ण केलाय. ते मुळचे जनपद कासगंज तालुक्यातल्या पटियाली गावातील बहादूर नगरचे राहणारे आहेत. बाबांचे वडील शेतकरी होते. त्यांनी गावातच शिक्षण पूर्ण केलं. भोले बाबांना तीन भाऊ आहेत. सर्वात मोठ्या भावाचा मृत्यू झालाय. दुसऱ्या क्रमांकाचे सूरज पाल आहेत. तिसरा भाऊ बीएसपीचा नेता आहे. ते बहादूर नगरचे 15 वर्षांपूर्वी सरपंच होते.
भोलेबाबासाठी अनेक एजंट करत होते काम
भोले बाबाचं नाव सूरज पाल आहे. बाबा होण्यापूर्वी ते एलआययूमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. त्यांनी 1999 साली नोकरी सोडली. बाबा झाल्यानंतर पांढरा सूट हीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नीचं नाव प्रेम बती आहे. भोलेबाबांसाठी अनेक जण एजंट म्हणून काम करत होते, असा आरोप लावण्यात येतोय. ते एजंट लोकांची दिशाभूल करुन पैसे घेत असतं. लोकांची दिशाभूल करण्यासाठी बाबाच्या बोटांवर चक्र दिसतं असा प्रचार ते एजंट करत असत.
( नक्की वाचा : प्रचंड गर्दी, उन्हाळा आणि बाहेर जायला... हाथरस दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव )
रुममध्ये सुंदर मुलींना एन्ट्री
नारायण साकर यांच्यावर गावातील जमीन अवैध बळकावल्याचा आरोप आहे. गावातील जमीन बळकावून तिथं आश्रम बनवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यांच्या आश्रमात सुंदर मुली राहातात असाही आरोप आहे. या रुममध्ये मुलींशिवाय फक्त खास लोकांनाच प्रवेश आहे. अन्य व्यक्तींना भोले बाबाच्या रुममध्ये जाण्याची परवानगी नाही. एखादा बाहेरचा व्यक्ती आला तर त्याला खोलीमध्ये जाण्यासाठी कधीही परवानगी दिली जात नाही.
लग्झरी कारमधून प्रवास पण...
भोले बाबांकडं अनेक महागड्या लग्झरी कार आहेत. बाबा या कारचा वापर करतात. पण, एकाही कारचं रजिस्ट्रेशन त्यांच्या नावावर नाही. सर्व कार दुसऱ्या लोकांवर विशेषत: भक्तांच्या नावावर आहेत. बाबानं स्वत:च्या नावावर काहीही ठेवलेलं नाही. बाबा एकदा जेलमध्येही जाऊन आल्याचं सांगितलं जातं. गेल्या काही वर्षांपासून बाबाची मान्यता सतत वाढत आहे. गेल्या वर्षी बाबच्या दरबारात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादवनं हजेरी लावली होती. अखिलेश यादव यांचे बाबांच्या दरबारातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.