हृदयद्रावक! जमीन विकली, मजुरी केली पण पत्नीला शिकवलं; नोकरी मिळताच तिने प्रियकराचा हात धरला

BPSC teacher betrayal case : विश्वास, त्याग आणि फसवणुकीची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BPSC teacher : शिक्षिका होताच ही महिला तिचा नवरा आणि मुलाला सोडून प्रियकरासोबत राहू लागली. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

BPSC teacher betrayal case : विश्वास, त्याग आणि फसवणुकीची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला शिकवण्यासाठी स्वतःचे रक्त आणि जमिनीचा तुकडाही विकला, मात्र त्याच पत्नीने सरकारी नोकरी मिळताच नवरा आणि 10 वर्षांच्या मुलाला वाऱ्यावर सोडले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नात्यांमधील ओलावा संपत चालल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण?

ही संतापजनक घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली आहे. पीडित पतीच्या दाव्यानुसार, 2013 मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नीला शिकवण्याची त्याची जिद्द होती. परिस्थिती बेताची असतानाही त्याने मजुरी केली आणि शहरात भाड्याने घर घेऊन पत्नीच्या शिक्षणाची सोय केली. पदवी आणि त्यानंतर बी.एड.चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने वडिलोपार्जित जमीन विकली. इतकेच नाही तर पैशांची नड भासली तेव्हा त्याने स्वतःचे रक्त विकून पत्नीच्या शिक्षणाचा खर्च भागवला.

Advertisement

( नक्की वाचा : Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी )
 

यशाची पायरी आणि बदलेले वागणे

नवऱ्याच्या या अफाट कष्टाला फळ मिळाले आणि पत्नीने BPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तिला शिक्षिका म्हणून सरकारी नोकरी मिळाली, मात्र इथूनच या कथेला धक्कादायक वळण मिळाले. नोकरी लागल्यानंतर पत्नीच्या वागण्यात बदल झाला. ट्रेनिंगच्या काळात तिची ओळख तिच्या कॉलेजमधील एका जुन्या मित्राशी झाली आणि त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. याच प्रेमसंबंधातून तिने आपल्या 10 वर्षांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

भररस्त्यात रंगला हायव्होल्टेज ड्रामा

23 मे रोजी हाजीपूर येथील भाड्याच्या घरात नवऱ्यानं त्याच्या बायकोला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले. यानंतर तिथे मोठा राडा झाला. नवऱ्यानं तातडीने डायल 112 ला फोन करून पोलिसांना पाचारण केले. पोलीस येण्यापूर्वीच स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नी आपल्या प्रियकरासोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम होती. पोलिसांनी याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वेदनादायी बाजू म्हणजे या दाम्पत्याचा 10 वर्षांचा मुलगा. आपल्या आईचे वागणे पाहून मुलानेही तिच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याने आपल्या आईवर गंभीर आरोप करत वडिलांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पती आणि पत्नी आता कायदेशीररीत्या वेगळे होण्याच्या तयारीत असून, एका पित्याने रक्ताचे पाणी करून घडवलेले करिअर अशा प्रकारे नात्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.