दिल्लीला बुधवारी संध्याकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नोएडा आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाचा जोर इतका होता की नव्याने बांधलेल्या संसद भवना बाहेरही पाणी साचले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय हवामान विभागाने दिल्लीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दिल्लीत अनेक दिवसांनंतर आलेल्या पावसाने एकीकडे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी पावसाचा जोर पाहाता अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. त्यामुळेही दिल्लीकरांची चांगलीच अडचण झाली आहे. दिल्ली मेट्रोच्या करोल बाग मेट्रो स्टेशन बाहेरचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.
सर्वांना आश्चर्यचकीत करणाराही एक व्हिडीओ समोर आला आहे. तो म्हणजे नव्या संसद भवनाचा. नुकतेच नवे संसद भवन तयार करण्यात आले. या संसद भवना बाहेरही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.